तरुण भारत

रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

प्रतिनिधी /बेळगाव

रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत असल्याने महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच ठेवण्यात आला आहे. सातत्याने सूचना करूनही नागरिक रस्त्याशेजारी व खुल्या जागेत कचरा टाकत आहेत. परिणामी विविध ठिकाणी कचरा टाकणाऱया नागरिकांना रंगेहात पकडून दंड वसूल करण्यात येत आहे. आता कापड दुकानदार व मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण करणाऱयांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

Advertisements

घरोघरी जावून कचऱयाची उचल केली जाते. कचरा रस्त्याशेजारी टाकू नका, असे आवाहन सातत्याने करण्यात येते. पण या सूचनेकडे नागरिक कानाडोळा करीत आहेत. कचरा स्वच्छता कर्मचाऱयांकडे देण्याऐवजी खुल्या जागेत किंवा रस्त्याशेजारी टाकत आहेत. अशाप्रकारे कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवून रंगेहात पकडण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. विशेषतः हॉटेल, विविध व्यावसायिक, मांस विपेत्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. शहरातील भंगीबोळ आणि खुल्या जागेत हॉटेल व मांस विक्री दुकानातील कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी मनपाचे पथक नियुक्त करून कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यात येत आहे. कचरा टाकताना आढळून आल्यास महापलिकेच्या कायद्यानुसार दंड वसूल करण्यात येत आहे. दररोज ठिकठिकाणी कचरा टाकणाऱयांकडून दंडाची वसुली करण्यात येत आहे.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकमध्ये मोटारसायकलची चोरी

Patil_p

जप्त केलेला साडेतीन क्विंटल गांजा केला नष्ट

Amit Kulkarni

कुंभारवाडा ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता

tarunbharat

माजी नगरसेवक संघटनेतर्फे पालकमंत्री, रेल्वेमंत्र्यांचा सत्कार

Patil_p

बसथांबे कचरामुक्त कधी होणार?

Patil_p

यल्लम्मा डोंगरावर भाविकांना येण्यास सक्तमनाई

Patil_p
error: Content is protected !!