तरुण भारत

रेल्वे पोलिसातील वर्दीतले दर्दी!

25 हून अधिक भिक्षेकऱयांची वैयक्तिक स्वच्छता करून धाडले निराधार केंद्रात

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

रेल्वेत व रेल्वेस्थानक परिसरात अंगावर मळकट कपडे घालून भिक्षा मागत फिरणाऱया 25 हून अधिक परप्रांतीयांना रेल्वे पोलिसांनी निराधार केंद्रात रवानगी केली आहे. तत्पूर्वी त्यांची वैयक्तिक स्वच्छता करून माणुसकीचे दर्शन घडविले. यामध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे.

रेल्वेस्थानक परिसरात नेहमी भिक्षुकांचा वावर असतो. वेळोवेळी यंत्रणा त्यांना पिटाळून लावते. ते पुन्हा त्याच ठिकाणी येतात. प्रसंगी रेल्वेत चढतात. बेळगाव ते मिरज किंवा लोंढय़ापर्यंत प्रवास करीत भिक्षा मागतात. भिक्षाटनावरच त्यांची गुजराण चालते. केवळ त्यांना हुसकावून देऊन काम चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी वेगळय़ा पद्धतीने त्यांची व्यवस्था केली आहे.

रेल्वे विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक भास्कर राव, पोलीसप्रमुख गौरी, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता, मंडल पोलीस निरीक्षक अंजनेय एच. आदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवानंद अरेनाड व त्यांच्या सहकाऱयांनी शनिवारी ही मोहीम राबविली. सुमारे 25 जणांना पोलीस स्थानकात आणून दिवसभरात त्यांची वैयक्तिक स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छतेअभावी अनेकांच्या केसात जटा झाल्या होत्या, अशांचे केस कापले. अंगावरील मळकट कपडे काढून त्यांना स्वच्छ कपडेही पोलिसांनीच पुरविले. दिवसभर भिक्षाटन करून अनेक महिला विश्रांतीसाठी रेल्वेस्थानकावर येत होत्या. त्यांची चौकशी करून खासबाग येथील महिला पुनर्वसन केंद्रात पाच महिलांची रवानगी केली. धारवाड येथील एक अल्पवयीन मुलगा रेल्वेतून प्रवास करत होता. घरी न सांगता तो रेल्वेत आला होता. कुडची (ता. रायबाग) येथे ताब्यात घेऊन बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली.

घटप्रभा रेल्वेस्थानकावर एक महिला दोन लहान मुलांसह गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्यास होती. तिला महांतेशनगर येथील बालसाहाय्यवाणीकडे मुलांसह सोपविले. 25 पैकी तब्बल 8 जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आढळून आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत कारवाई करून विशेष दंडाधिकाऱयांसमोर हजर केले. रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमात बसवराज बंडीवड्डर, मलिकसाब मुल्ला, पावडी सरव, संगाप्पा कोटय़ागोळ, प्रभू गोणी, रायाप्पा गुंडगी, राघवेंद्र उळ्ळागड्डी, संज्योता चानगी, विजयादशमी पाटील आदींनी भाग घेतला.

Related Stories

भुतरामहट्टीजवळ अपघातात युवक ठार

Patil_p

लोकमान्य’तर्फे सांबरा येथे मोफत नेत्रचिकित्सा-वाहन तपासणी

Omkar B

शहरातील पथदीप-हायमास्ट बंदच

Amit Kulkarni

शास्त्रीनगर परिसरातील नाल्याची स्वच्छता

Amit Kulkarni

‘विद्यागम’ला कायमचा बेक दिल्यास मोठे नुकसान

Patil_p

टोल चुकविण्यासाठी कोगनोळीतून वाहतूक

Patil_p
error: Content is protected !!