तरुण भारत

रुग्णसंख्येत घट तरीही सीमेवर सतर्कता

रविवारी 48 नवे रुग्ण, 58 जण झाले बरे, अद्याप 588 सक्रिय रुग्ण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरि÷ अधिकाऱयांनी कोगनोळी व कागवाड चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली आहे.

रविवारी जिल्हय़ातील आणखी 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 296 इतका झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 58 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांमधून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 76 हजार 843 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 588 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

सांबरा एटीएसमधील आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिरेबागेवाडी, आनंदनगर-वडगाव, चव्हाट गल्ली, जाधवनगर, हिंडाल्को, शास्त्राrनगर, श्रीनगर, रक्षक कॉलनी-विजयनगर, भाग्यनगर, शिवाजीनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 4 हजार 570 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.

आतापर्यंत 10 लाख 87 हजार 386 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 10 लाख 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. मृतांचा सरकारी आकडा 865 इतका आहे. अद्याप 60 हजारहून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. रविवारी सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर, बैलहोंगल तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही.

केरळ व महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सीमेवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. कर्नाटकासह दहा राज्यातील 46 जिल्हय़ात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कडक निर्बंध घातले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाणार, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या सीमेवर तपासणी वाढविण्यात आली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे.

Related Stories

मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावा

Patil_p

पाडव्यानिमित्त गवळी बांधवांनी सजविल्या म्हशी

Patil_p

केएलईत आजपासून लहान मुलांना मोफतलसीकरण

Amit Kulkarni

सार्वजनिक गणपती विसर्जन

Patil_p

अचानक गॅस वाहिनी फुटल्याने उडाला गोंधळ

tarunbharat

रुक्मिणीनगर येथे आठ जुगाऱयांना अटक

Patil_p
error: Content is protected !!