तरुण भारत

सांगली : भिलवडी अंकलखोप सरपंचानी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

वार्ताहर / भिलवडी 

कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांच्या वतीने भिलवडी अंकलखोप सह परिसरातील सर्व गावच्या सरपंचांच्या हस्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.भिलवडी सह परिसरातील कृष्णाकाठची गावे शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करून सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे,शेतीला भरीव निधी द्या, कोरोना व महपुराने बाधित व्यापाऱ्यांना मदत करा,वसंतदादानगर, मौलानानगर, आण्णाभाऊ साठेनगर, साखरवाडी या भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, कृष्णा नदीवर असणाऱ्या पूलाला समांतर पूल तयार करावा आदी माग न्यांचा यामध्ये समावेश आहे.

Advertisements

भिलवडी सरपंच सविता महिंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले . तर अंकलखोप येथील पूरग्रस्तांच्या समस्या बाबत मुख्यमंत्र्यांना सरपंच अनिल विभुते यांनी निवेदन दिले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, यावेळी खासदार धैर्यशील माने, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, नितीन बानुगडे- पाटील आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर, सुमनताई पाटील, अरुण आण्णा लाड आदि. मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

नोकरीच्या मागे न लागता मोठे उद्योजक बना

Abhijeet Shinde

इस्लामपूर नगरपालिका : मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरुन सभा तहकूब

Sumit Tambekar

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

वाळवा तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

Abhijeet Shinde

सांगली : सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले २ लाख

Abhijeet Shinde

जतमध्ये बंधाऱ्यात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!