तरुण भारत

ऋतिकसोबत झळकणार नाभा नतेश

‘द नाइ मॅनेजर’ या वेबसीरिजच्या हिंदी रिमेकवरून अभिनेता ऋतिक रोशन दीर्घकाळापासून चर्चेत आहे. प्रसिद्ध कादंबरी ‘द नाइट मॅनेजर’वर बेतलेली ही वेबसीरिज ब्रिटिश टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वोत्तम सीरिजपैकी एक मानली जाते. याच्या यशाचा लाभ घेण्यासाठी निर्माते लवकरच याची हिंदी आवृत्ती सादर करण्याच्या तयारीत आहेत.

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री नाभा नतेश या सीरिजमध्ये ऋतिक रोशनची नायिका म्हणून झळकणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. या सीरिजद्वारे ऋतिक देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ‘द नाइट मॅनेजर’च्या हिंदी रिमेकमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी मनोज वाजपेयी यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव नाकारला आहे. चित्रिकरणाच्या तारखांवरून मनोज यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. आर्म्स डीलर रिचर्ड रोपर या भूमिकेसाठी त्यांचे नाव विचारात घेण्यात आले होते.

Advertisements

या सीरिजचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होऊ शकते. या सीरिजची निर्मिती बनिजय एशिया या प्रॉडक्शन हाउसकडून केली जाणार आहे. सीरिजमध्ये टॉम हिडलेस्टन यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेत ऋतिक दिसून येणार आहे. सीरिजचे दिग्दर्शन संदीप मोदी करणार आहेत.

Related Stories

ललित प्रभाकर झळकणार टर्रीमध्ये

Patil_p

डॉ.निलेश साबळे म्हणणार लाव रे तो विडिओ

Patil_p

आशुतोष पत्कीने शेअर केले क्वॉरंटाईन वेळापत्रक

Patil_p

चांगल्या संधीच्या शोधात : ईशा

Amit Kulkarni

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

triratna

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

Rohan_P
error: Content is protected !!