तरुण भारत

न्यायाधीशाच्या हत्येप्रकरणी 243 लोक ताब्यात

17 जणांना अटक – दोन पोलीस अधिकारी निलंबित

वृत्तसंस्था/ धनबाद

Advertisements

झारखंडच्या धनबाद येथे अतिरिक्त जिल्हा तसेच सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी रविवारी 243 जणांना ताब्यात घेतले, तर अन्य 17 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

न्यायधीशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील धनबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी दिला आहे. तर न्यायाधीशांना धडक दिलेल्या ऑटो रिक्षाच्या चोरीची तक्रार नोंदविण्यास विलंब केलयाप्रकरणी पाथरडीह पोलीस स्थानकाचे प्रभारी उमेश मांझी यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी आदर्श कुमार यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे.

न्यायाधीश आनंद 28 जुलै रोजी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता एका ऑटो रिक्षाने त्यांना मागून धडक दिली होती. यामुळे न्यायाधीशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्देशावर पोलीस महासंचालकांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. हे पथक उच्च न्यायालाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करणार आहे.

ऑटोरिक्षा चालक लखनकुमार वर्मा तसेच दुसरा आरोपी राहुल वर्मा देखील स्थानिक रहिवासी आहे. घटनेवेळी ऑटोरिक्षा चालवत होते अशी कबुली लखनकुमारने दिल्याचे विशेष तपास पथकाकडून सांगण्यात आले. यादरम्यान शनिवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या पूर्ण प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करविण्याची शिफारस केली होती.

धरपकड सुरू

धनबादमधील न्यायाधीशाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी रविवारी 200 हून अधिक ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईमुळे ऑटोरिक्षा चालक आणि मालक दोघेही त्रस्त झाले आहेत. सोमवारी देखील 100 हून अधिक ऑटोरिक्षांना पोलीस स्थानकात आणले गेले.

Related Stories

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; ५० ते ६०जण अडकल्याची शक्यता

Abhijeet Shinde

आता इंडिया गेटवर नाही, तर ‘या’ ठिकाणी प्रज्ज्वलित होणार अमर जवान ज्योती

Abhijeet Shinde

महात्मा गांधी स्मृतिदिन: मोदींसह दिग्गजांकडून राजघाटावर श्रद्धांजली

prashant_c

…अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको

datta jadhav

‘गुलाब’ चक्रीवादळ घोंघावणार

datta jadhav

दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा 80 हजार पार

Rohan_P
error: Content is protected !!