तरुण भारत

डेल्टा प्लसवरही कोव्हॅक्सिन प्रभावी

संशोधनाअंती आयसीएमआरचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोव्हॅक्सिन ही संपूर्णतः भारत निर्मित लस कोरोनाच्या डेल्टा प्लस या सर्वात घातक समजल्या जाणाऱया रुपावरही प्रभावी आहे, असा निष्कर्ष आयसीएमआर या भारतीय प्राधिकारणाने सखोल संशोधनाअंती काढला आहे. कोव्हॅक्सिन या लसीची प्रतिजैविके तयार करण्याची क्षमता किंचित कमी असली तरी, ती कोरोनाच्या नव्या अधिक वेगाने पसरणाऱया रुपांवर जास्त प्रभावी असल्याचे या संस्थेने स्पष्ट केले.

कोव्हॅक्सिन या लसीमुळे डेल्टा प्लस, एवाय 1, आणि बी 1 167 3 ही कोरोनाची अधिक त्रासदायक रुपेही निष्प्रभ होतात. डेल्टा 1 हे रुप कित्येक लसींना दाद न देता संसर्ग पसरविते. त्यामुळे लस घेतलेल्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. नुकतेच या डेल्टा प्लस रुपात आणखी एक परिवर्तन झाले असून ते डेल्डा एवाय 1 या नावाने ओळखले जाते. तेही काही लसींना दाद देत नाही. मात्र, कोव्हॅक्सिन त्यावर गुणकारी आहे.

कोव्हॅक्सिचे दोन डोस सुरक्षित

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 1 डोस घेतलेल्यांमधील संसर्गापेक्षा कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे लसींचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, असेही तज्ञांचे मत आहे. कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेऊन पूर्ण लसीकरण करुन घेतलेले लोक कोरोनाच्या कोणत्याही रुपापासून तुलनेने जास्त सुरक्षित असतात, ही बाब दिलासादायक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Related Stories

आंध्र प्रदेशात एका खाजगी कंपनीत गॅस गळती; दोघांचा मृत्यू

Rohan_P

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p

बांदीपोरा पूल उडवण्याचा कट उधळला

Patil_p

तिबेटच्या नव्या ‘सिक्योंग’ने घेतली शपथ

Amit Kulkarni

कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

datta jadhav

तिसऱ्या उद्रेकासंबंधी अनेक गैरसमज

Amit Kulkarni
error: Content is protected !!