तरुण भारत

चेन युफेईला महिला बॅडमिंटन एकेरीचे सुवर्ण

जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित तई त्झू यिंगला नमवले, तीन गेम्समध्ये बाजी

चीनच्या चेन युफेईने जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित तैवानच्या तई त्झू यिंग हिचा 21-18, 19-21, 21-18 अशा निसटत्या फरकाने पराभव करत महिला बॅडमिंटन एकेरीचे सुवर्ण जिंकले. चेनच्या या विजयामुळे बॅडमिंटनमध्ये चिनी महिलांचे पर्व नव्याने सुरु झाले आहे. 2016 रिओ डे जानेरिओ ऑलिम्पिकमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सुवर्ण जिंकण्यापूर्वी चीनने सलग 4 सुवर्णपदके जिंकली होती. आता तोच धडाका नव्याने सुरु करण्याचा श्रीगणेशा त्यांनी येथे केला. स्पेनची कॅरोलिना मारिन गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकली नाही.

Advertisements

जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित चेन युफेईने तईला तीन गेम्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तईच्या जागतिक स्तरावरील सर्व चाहत्यांना ती सुवर्ण जिंकण्याची अपेक्षा होती. मागील काही वर्षात तईने सातत्यपूर्ण कामगिरी साकारली. पण, यंदा टोकियोत ऑलिम्पिक गोल्ड जिंकण्याची महत्त्वाकांक्षा तिला सर करता आली नाही.

तई सध्या अवघ्या 27 वर्षांची आहे. पण, तरीही तिच्या मनात निवृत्तीचे विचार घोळत आहेत. टोकियोतील या फायनलनंतर देखील तिने याचा पुनरुच्चार केला. ‘मी 27 वर्षाची आहे, हे जरी खरे असले तरी आतापर्यंतचे निम्मे आयुष्य खेळत राहण्यातच गेले आहे. मला आता थोडी विश्रांती घ्यायची आहे’, असे ती येथे म्हणाली.

सिंधूच्या खिलाडूवृत्तीमुळे भारावली तई त्झू यिंग!

सुवर्णपदकासाठी फायनल लढतीत पराभव पत्करावा लागलेल्या तई त्झू यिंग हिला सिंधूच्या खिलाडूवृत्तीची आणखी एकदा प्रचिती आली. चेन युफेईने तईला हरवत सुवर्ण जिंकले आणि पदक वितरणानंतर सिंधूने तईकडे येत तिचे सांत्वन केले. तू छान खेळलीस, पण, एकेक दिवस आपले असत नाहीत. मीही या अनुभवातून गेले असल्याने तुझ्या यावेळी काय भावना असतील, याची मला जाणीव आहे, असे सिंधू तिला म्हणाली आणि तईने तिचे येथे आभार मानले. तईने नंतर सिंधूसमवेतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट केले.

Related Stories

विश्वचषकातील ‘तो’ पराभव आजही सल देणारा

Patil_p

थॉमस, उबेर चषकाचा ड्रॉ जाहीर

Patil_p

इब्राहिमोविकला स्वीडनचा गोल्डन बॉल पुरस्कार

Omkar B

ओव्हलवर दुमदुमली विराट विजयाची ललकारी!

Patil_p

माद्रिद स्पर्धेत व्हीनसला वाईल्ड कार्ड

Patil_p

वास्कोत आज अपराजित नॉर्थईस्ट युनायटेडची लढत चेन्नईनशी

Patil_p
error: Content is protected !!