तरुण भारत

नूतन आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी स्विकारला पदभार

प्रतिनिधी/ सातारा

 डॉ. अनिरूध्द आठल्ले यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर मागील काही दिवस सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पद रिक्त होते. आता सातारा जिल्हाचे नुतन आरोग्य अधिकारी डॉ राधाकिशन पवार यांनी सोमवारी जिल्हा परिषद सातारा येथे आपला पदभार स्विकारला. यावेळी त्यांचे स्वागत डॉ सचिन पाटील, डॉ प्रमोद शिर्के, डॉ अविनाश पाटील, डॉ अशोक मिसाळ व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

 डॉ. राधाकिशन पवार हे यापुर्वी बीड येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. बीड येथे त्यांनी कार्यभार सांभाळताना प्रशासन गतीमान होण्यासाठी टेक्नॉलॉजीवर अधिक भर दिला. तसेच गोर-गरीब रूग्णांबरोबर विशेषता ग्रामीण भागातील सेवांसाठी थेट संपर्क त्यांनी ठेवला होता. त्यामुळे आरोग्य विभागांच्या सेवामध्ये सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर कसा राहिल यावर ते अधिक भर देणार आहेत.

Related Stories

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झेडपीच्या काही विभागात शुकशुकाट

Patil_p

फलटण तालुक्यातील बाधित गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या भेटी

datta jadhav

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

Patil_p

लोणंद शहरात मावा व गुटखा विक्री जोमात

Abhijeet Shinde

नागठाणेतील माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा

datta jadhav

सातबारा उतारा दुरुस्तीसाठी एकाचे आमरण उपोषण

Patil_p
error: Content is protected !!