तरुण भारत

वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी /वास्को

वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांचा सोमवारी भाजपाचे नेते व इतर मान्यवर तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील मुख्य कार्यालयात वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दुगाबट्टी पुरंदेश्वरी यांची खास उपस्थिती लाभली होती.

Advertisements

दुगाबट्टी पुरंदेश्वरी यांनी मंत्री माविन गुदिन्हो यांना शुभेच्छा दिल्या. मंत्री गुदिन्हो यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतिष धोंड, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, मुरगावचे माजी नगरसेवक क्रितेश गावकर, नगरसेवक लियो रॉड्रिक्स, विनोद किनळेकर, सुदेश भोसले, सरंपच रमाकांत बोरकर, पक्षाचे पदाधिकारी, पंच सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांच्या नवेवाडेतील विस्तारीत कार्यालयाचे तसेच कागदी पिशव्या बनवण्याच्या विस्तारीत उद्योगाचेही उद्घाटन पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दुगाबट्टी पुरंदेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

कामगार निधी घोटाळा प्रकरण आता एसीबीकडे

Patil_p

देशाच्या विकासासाठी भाजपाला गोवा जिंकणे महत्वाचे – जी किशन रेड्डी

Amit Kulkarni

गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणीच्या नियमांत बदल

Rohan_P

शेकोटी संमेलनाची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

भाजपच्या विजयासाठीच चर्चिल यांचे पक्षांतर

Amit Kulkarni

एक कोटीचा मद्यसाठा आगीच्या भक्ष्यस्थानी

Omkar B
error: Content is protected !!