तरुण भारत

घुमणार आता… जय जय राम कृष्ण हरि!

पं मनोहरबुवा शिरगांवकर भजन स्पर्धेची घोषणा : 5 पासून प्रवेशिका, विभागीय स्पर्धा 15 पासून,कोरोनामुळे काही बदल

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोमंतकीयांना मोठी उत्सुकता लागून असलेली कला अकादमीची 41 वी पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल मंगळवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती. स्पर्धेच्या प्रवेशिका 5 ऑगस्टपासून उपलब्ध होतील. 15 ऑगस्टपासून विभागीय फेरीला प्रारंभ होणार आहे.

यावर्षी स्पर्धेच्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. कोविडमुळे पथकातील सहभागी कलाकारांची संख्या कमी करण्यात आली असून कमीत कमी आठ व जास्तीत जास्त 12 कलाकारांना सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर फक्त महिला व पुरूष या गटात स्पर्धा होतील. मुलांच्या स्पर्धा होणार नाहीत.

सादरीकरणाच्या अनुक्रमात बदल

कोविड महामारी लक्षात घेऊन यंदा सादरीकरणाचा अनुक्रम ठरविण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे स्पर्धास्थळी सर्वांसमक्ष चिठ्ठय़ा टाकून स्पर्धेचा अनुक्रम ठरविण्याऐवजी अकादमी सुरूवातीलाच संबंधित सत्रांमध्ये सहभागी होणाऱया पथकांच्या सादरीकरणाचा अनुक्रम आगाऊ जाहीर करण्यात येईल. त्यासाठी पथकाच्या नावातील मराठी मुळाक्षरातील बाराखडीच्या अक्षरक्रमांकानुसार स्पर्धेतील सादरीकरणाचा अनुक्रम निश्चित करण्यात येईल. समान अक्षराचे पथक असल्यास प्रवेशिका कला अकादमी कार्यालयात दाखल झालेला नोंदणी क्रमांक प्रथम आलेल्यास प्रथम या तत्त्वावर विचारात घेता येईल, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.

विभागीय स्पर्धेची ठिकाणे निश्चित

कोरोना नियमामुळे स्पर्धेची ठिकाणेही निश्चित करण्यात आली असून यात रवींद्र भवन सांखळी, राजीव गांधी कला मंदिर फोंडा, कला व संस्कृती संचालनालय पणजी, आवश्यकता असेल तर रवींद्र भवन कुडचडे, रवींद्र भवन मडगाव या ठिकाणी आयोजन करण्यात येईल. पेडणेवासियांसाठी श्री संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय सभागृह याठिकाणी स्पर्धा घेण्यात येईल.

दरवर्षी भजनी स्पर्धेत पुरूष कलाकारांची 80 हून जास्त पथके असतात तर महिलांची 100 हून जास्त असतात. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे कमी संख्या करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यात येईल असे गावडे यांनी सांगितले.

Related Stories

कोरोनासाठी शुक्रवार ठरला काळा दिवस

Patil_p

युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

Amit Kulkarni

नाणूस ते गांजे रस्त्यावर ‘खड्डे आमच्या नशिबी’ प्रवास सुटणार कधी?

Amit Kulkarni

पालिका निवडणुकांबाबत धोरणात्मक निर्णय

Patil_p

गोवा ‘टीएमसी’च्या प्रमुख योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

आमदार अपात्रताप्रकरणी याचिका 24 रोजी सुनावणीस

Amit Kulkarni
error: Content is protected !!