तरुण भारत

‘सुवर्ण’स्वप्न भंगले; आता कांस्य पदकाची आशा

ऑनलाईन टीम / टोकियो :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या सेमी फायनलमध्ये बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचा 5-2 असा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचे या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

Advertisements

या सामन्यात भारताने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला गोल करता आला नाही. मात्र, त्यानंतर
बेल्जियमला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळत गेले आणि त्यांनी ही आघाडी कायम ठेवत भारतीय संघाचा 5-2 ने पराभव केला. पेनल्टी कॉर्नर हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावे लागणार आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल.

Related Stories

माझ्या वडिलांना सोडा; बेपत्ता जवानाच्या मुलीचा मन सुन्न करणारा व्हिडिओ

Abhijeet Shinde

ऍस्टोन व्हिलाकडून लिव्हरपूल एकतर्फी धुव्वा

Patil_p

राजस्थान रॉयल्सला दिलासा त्या महागडय़ा खेळाडूचा सराव सुरू

Patil_p

भारताचे आणखी दोन नेमबाज कोरोना बाधित

Patil_p

गुजरातमधील 3 कंपन्यांशी ‘भारत बायोटेक’चा करार

Patil_p

त्वचा घासल्यावर शरीरातून येतो सुगंध

Patil_p
error: Content is protected !!