तरुण भारत

काय करते मीरा राजपूत

मीरा राजपूत खूपच लोकप्रिय आहे. ती ग्लॅमरस दिसते. मीरा बॉलिवूडमध्ये नसली तरी तिचं दिसणं आणि असणं सर्वांनाच हवंहवंसं वाटतं. मीरा राजपूत दोन मुलांची आई आहे. मात्र तिने आपला फिटनेस जपलेला आहे. मीरा तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे योगा करते. मीरा राजपूत आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्टेड असते. ती आरोग्य, फिटनेस, सौंदर्य अशा विविध विषयांवरील टिप्स शेअर करते असते. मीरा सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहे. मीराने नुकताच योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. योगामुळे आपण आयुष्यभर तंदुरुस्त राहू शकतो, असं मीराला वाटतं. योगा कठीण नसल्याचं तिने म्हटलं आहे. योगाची सुरूवात करण्यासाठी तुम्ही फार मोठं काहीतरी करायला हवं असं नाही. फक्त योगा मॅट आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. कशालाही उशीर झालेला नसतो. त्यामुळे तुम्ही योगा करत रहायला हवा, असं तिचं म्हणणं आहे.

मीरा राजपूत उत्तनासन करताना दिसते. यामुळे शरीराचा खालचा भाग लवचिक होतो. तसंच मांडय़ांच्या स्नायूंना बळकटी मिळते. मीरा वीरभद्रासन करताना दिसते. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हलासन हा सुद्धा अत्यंत प्रभावी असा व्यायाम प्रकार आहे. मात्र हलासन करताना इतरांची मदत घ्या. मार्गदर्शकांच्या देखरेखीखालीच हलासन करा. हलासनाचे शरीराला होणारे असंख्य लाभ बघता हा योगप्रकार नक्की शिकून घ्या. मीराला अधोमुख श्वानासन करायला खूप आवडतं. वजन कमी करण्यासोबतच स्नायू बळकट करण्यासाठीही  हे आसन उपयुक्त ठरतं. ही योगासनं केल्यानंतर मीरा प्राणायामही करते.   फुफ्फुस तसंच श्वसन यंत्रणेचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्राणायाम खूपच आवश्यक आहे. प्राणायामामुळे मानसिक शांतता लाभते. श्वासांवर नियंत्रण येत. म्हणूनच ही योगासनं नियमितपणे करायला हवीत.

Advertisements

Related Stories

फाईव्ह जि स्मार्टफोन घेताय

Amit Kulkarni

स्वतःसाठी वेळ मिळाला !

Omkar B

बीटाने उजळवा त्वचा

Omkar B

आनंदी जगण्याची पंचसूत्री

Omkar B

गॉगल खरेदी करताय

Amit Kulkarni

लाभ गलिसरिनेचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!