तरुण भारत

हेल्दी एंड टेस्टी टाकोज

उरलेल्या पोळ्यांचं काय करायचं, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. फोडणीची पोळी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी शिळ्या पोळ्यांपासून काही चविष्ट पदार्थ बनवता येतील. हे पदार्थ मुलंही अगदी आवडीने खातील. असाच एक पदार्थ म्हणजे टाकोज. नेहमीच्याच पोळीला ट्विस्ट देऊन तुम्ही टाकोज बनवू शकता. टाकोज हा मेक्सिकन पदार्थ आहे. यात पोळीमध्ये चीज, भाज्या किंवा इतर घटकांपासून तयार करण्यात आलेलं सारण भरलं जातं. पोळीपासून टाकोज बनवण्यासाठी  उरलेल्या पोळीच्या दोन्ही बाजूंना बटर लावून घ्या. यानंतर काटा चमच्याने पोळीवर छोटी छिद्रं पाडा. ही पोळी मायक्रोवेव्ह कन्वेक्शन मोडमध्ये 200 अंश सेल्सियस तापमानात 5 मिनिटं भाजून घ्या. यामुळे पोळी छान कुरकुरीत होईल. पोळी थोडी दुमडून घ्या. यात तुम्ही भाज्या, पनीर, चीज, मशरूम, सोया चंक्स, अंडी या पदार्थांपासून बनवलेलं सारण भरू शकता. हे टाकोज सॉससोबत खाता येतील.

Related Stories

खरबूज मिल्क शेक

tarunbharat

रागी कुकीज

Omkar B

समतोल आहाराचे महत्त्व

tarunbharat

शेवया इडली

Omkar B

मस्त नूडल्स कटलेट

Amit Kulkarni

पनीर कोफ्ता

Omkar B
error: Content is protected !!