तरुण भारत

101 वर्षांची ‘लॉबस्टर लेडी’

व्हर्जिनिया ओलिवर सांभाळत आहेत वोटची कमान

झिंगा मासा पकडण्याचे कसब

Advertisements

अमेरिकेत माइने येथे राहणाऱया व्हर्जिनिया ओलिवर 101 वर्षांच्या झाल्या आहेत. पण या वयातही मासेमारी करणाऱया नौकेची कमान त्या उत्तमपणे सांभाळत आहेत. त्यांना झिंगा मासा पकडण्यात प्राविण्य प्राप्त आहे. याचमुळे त्यांना लॉबस्टर लेडी म्हटले जाते. त्या जगातील सर्वात वृद्ध परवानाधारक लॉबस्टर वुमन आहेत.

वयाच्या 7 व्या वर्षापासून त्या हे काम करत आहेत. ओलिवर पहाटे 3.30 वाजता उठतात आणि स्वतःच्या नौकेवर 5 वाजता पोहोचतात. ओलिवर आणि त्यांचा मुलगा मॅक्स अनुकूल वातावरण असेल तरच नौकेद्वारे प्रवास करतात. ओलिवर कुठल्याही स्थितीत काम करण्यास तयार असतात. त्या कधीच थांबत नसल्याचे मॅक्स यांनी म्हटले आहे.

या मातापुत्राला मदत करण्यासाठी स्प्रूस हेड लॉबस्टर पाउंडला ओपची टीम सदैव तयार असते. घाऊक पातळीवर योग्य दर मिळावा असा त्यांचा प्रयत्न असतात. आगामी काळातही ओलिवर कधीच स्वतःच्या या कामापासून दूर जाऊ इच्छित नाहीत.

स्वतःसाठी कधीच व्हिलचेअरचा वापर पसंत करणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या वयातही काम का करता असे अनेक जण मला विचारत असतात. अशा लोकांना मी अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःचे काम सुरूच ठेवणार असल्याचे सांगू इच्छिते असे त्या म्हणतात. ओलिवर यांचा जन्म 1920 मध्ये झाला होता. तेव्हापासून त्या रॉकलँडमधील एका स्ट्रीटमध्ये राहत आहेत.

Related Stories

ट्रम्प यांच्या विदेश धोरणाला आणखी एक यश

Patil_p

ब्रिटनमध्ये हॉटेलचे 50 टक्के बिल सरकार भरणार

datta jadhav

आयर्लंडमध्ये शिवलिंगासारखा भाग्याचा दगड

Patil_p

अधिक फैलाव, पण जीवघेणा नाही

Patil_p

जगावर आर्थिक मंदीची गडद छाया

prashant_c

हुश्श….बाहेर पडलो एकदाचे

Patil_p
error: Content is protected !!