तरुण भारत

राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची रश्मीची इच्छा

कठोर मेहनत करत असल्याची टिप्पणी

टेलिव्हिजन क्षेत्रात नाव कमाविल्यावर रश्मी देसाई आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळली आहे. ‘तंदूर’ या वेबसीरिजसोबत ओटीटीवर पदार्पण करणाऱया रश्मीने एका मुलाखतीत राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची इच्छा असल्याने त्याकरता काम करत असल्याचे म्हटले आहे.

Advertisements

ओटीटीवरील शोमध्ये व्यक्तिरेखेसोबतच पटकथाही महत्त्वाची असते. डिजिटल प्रोजेक्ट्ससाठी अनेकदा वर्ड-ऑफ-माउथ पब्लिसिटी काम करत असते. वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता असे ती सांगते.

एक कलाकार म्हणून ओटीटीवर नशीब आजमाविण्याची इच्छा होती. माझी अनेक स्वप्ने असून ती पूर्ण करू इच्छिते. राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यासाठीचा प्रवास किती मोठा असेल हे माहित नाही. टेलिव्हिजन चांगले व्यासपीठ आहे, पण प्रत्येक माध्यमाचे स्वतःचे स्वारस्य, प्रेक्षकवर्ग असतो असे मत तिने व्यक्त केले आहे.

नव्या गोष्टी शिकण्याची तयारी नव्या गोष्टी शिकण्यासाठी मी तयार आहे. स्वतःच्या विशिष्ट गोष्टींमध्ये बांधून ठेवणे मला आवडत नाही. स्वतःच्या चुकांमधून मी शिकले आहे. कुठलेही नवे काम करण्यास वेळ लागतो. कलाकार म्हणुन स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आणणे गरजेचे आहे. कलाकाराचे जीवन ग्लॅमरस वाटते, पण ते तितके निश्चितच सोपे नसते. लोक प्रेम करतात, द्वेष अन् तुलनाही करत असल्याचे रश्मीने म्हटले आहे.

Related Stories

गस्तमध्ये झळकणार सैराटमधील बाळ्या

Patil_p

कोरोना काळात सुरक्षिततेचा गजर

Patil_p

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी सुरु

Rohan_P

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये लगीनघाई

Patil_p

दुबईत साजरा होणार ‘गल्फ सिने फेस्ट’

Omkar B

राधे युवर ‘मोस्ट वॉण्टेड भाई’

Patil_p
error: Content is protected !!