तरुण भारत

‘नयट्टू’च्या हिंदी रिमेकमध्ये जॉन अब्राहम

अभिनेत्याने खरेदी केले चित्रपटाचे हक्क

दिग्दर्शक मार्टिन प्राकट यांचा मल्याळी चित्रपट ‘नयट्टू’ एप्रिल महिन्यात चित्रपटगृहांमध्ये झळकला होता. आता हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतही तयार केला जाणार आहे. जॉन अब्राहमने या चित्रपटाचे हिंदी हक्क खरेदी केले आहेत. या थ्रिलरपटात कुंचाको बोबन, जोजू जॉर्ज आणि निमिषा सजयन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Advertisements

जॉनने स्वतःच्या जेए एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाउसमार्फत हे हक्क प्राप्त केले आहेत. यापूर्वी  ‘अयप्पनम कोशियुम’ या मल्याळी चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यात आले होते.

गीता आर्ट्सच्या बॅनरखाली अभिनेता अल्लू अर्जुनने चित्रपटाचे तेलगू हक्क प्राप्त केले आहेत. याच्या तमिळ रिमेकचे दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन करणार आहेत.

नयट्टू हा चित्रपट 8 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पण महामारीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. एक महिन्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे समीक्षक तसेच प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

Related Stories

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Rohan_P

राधेश्यामचा प्री टीजर प्रदर्शित

Patil_p

सुनील गोडबोलेंची टाळेबंदी युक्ती ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण

Patil_p

नातेसंबंधांमधील भयावह गोष्टी ‘द इनव्हिजीबल मॅन’

tarunbharat

‘वागले की दुनिया’ ‘बेस्ट शो ऑन इंडियन टेलिव्हिजन’

Patil_p

कोरोनापासून देशाचे रक्षण करण्यासाठी अलका कुबल यांचे साकडे

Patil_p
error: Content is protected !!