तरुण भारत

देशाची निर्यात 47 टक्क्यांनी तेजीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाची निर्यात जुलै महिन्यात 47.19 टक्क्यांनी वाढून 35.17 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये पेट्रोलियम, इंजिनिअरिंग आणि रत्ने तसेच आभूषणे या क्षेत्रांमध्ये सकारात्मक स्थिती राहिल्याने एकूण निर्यातीत उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद केली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

Advertisements

उपलब्ध आकडेवारीनुसार जुलै महिन्यात आयात 59.38 टक्क्यांच्या वृद्धीसह 46.40 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. यासह व्यापारी तोटा 11.23 अब्ज डॉलर्सवर राहिला. याच महिन्यात पेट्रोलियम निर्यात वाढून 3.82 अब्ज डॉलर्सवर राहिली, इंजिनिअरिंग निर्यात 2.82 अब्ज डॉलर्स तसेच रत्ने आणि आभूषणे यांची निर्यात 1.95 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. दुसऱया बाजूला तांदूळ, मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादनांमध्ये घसरण राहिली आहे.

अमेरिका, संयुक्त अरब अमीरात(यूएई)तसेच बेल्जियमची निर्यात वाढून क्रमशः 2.4 अब्ज डॉलर, 1.21 अब्ज डॉलर आणि 48.9 कोटी डॉलर्सवर राहिली आहे.

……………………….

Related Stories

शो थांबल्याने टीव्ही चॅनेल्सच्या जाहिराती घटल्या

Patil_p

झोमॅटोचा आयपीओ 14 जुलैला लाँच

Patil_p

चौथ्या तिमाहीत एचडीएफसी बँक नफ्यात

Patil_p

सेलची विक्री 35 टक्के वाढली

Patil_p

‘डि मार्ट’कडून चार वर्षांत मजबूत परतावा

Patil_p

अदानी ग्रीन एनर्जी नफ्यात

Patil_p
error: Content is protected !!