तरुण भारत

गर्लगुंजी येथे आधुनिक पद्धतीच्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

ग्रा. पं. ने साकारली दुमजली इमारत, आरोग्य संपदा जपण्यासाठी व्यायाम आवश्यक : युवकांनी लाभ घेण्याचे ग्रा. पं. चे आवाहन

वार्ताहर /खानापूर

Advertisements

गर्लगुंजी ग्रामपंचायतीच्या नवीन बांधलेल्या व्यायाम शाळेत ग्राम पंचायत अध्यक्ष व सदस्य यांच्यावतीने सुसज्ज जिमचे उद्घाटन ग्राम पंचायत अध्यक्षा अनुराधा नंदकुमार निट्टरकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगेसह सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी परशुराम चौगुले, अजितराव पाटील, प्रसाद पाटील, वंदना पाटील, रेखा कुंभार, ललिता कोलकार, अन्नपूर्णा बुरुड, सविता सुतार तसेच पीडीओ ज्योतिबा कामकर आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत विकास अधिकारी ज्योतिबा कामकर यांनी स्वागत केले. गर्लगुंजी तालीमबद्दल ग्रामपंचायत माजी अध्यक्ष परशराम चौगुले व गोपाळ पाटील यांनी सांगितले की, स्वांतत्र्यापूर्वी प्रत्येक घरात एक पैलवान असायचा. व्यायामाची गरज लक्षात घेता 1950 च्या काळात गर्लगुंजी तालमीची स्थापना झाली. असे वडीलधारी मंडळी सांगत होते. गावातील परिस्थिती हालाखीची होती. तालीम नसल्याने पैलवान शेतात कुस्तीचा सराव करत होते. गावात चांगले पैलवान तयार व्हायचे असल्यास तालमीची गरज असल्याची जाणीव सर्वांना झाली. त्यातून पुंडलिक मेलगे, माजी आमदार वसंतराव पाटील, लुमाण्णा निट्टूरकर, मल्लू मेलगे आदी कुस्तीप्रेमींनी एकत्र येऊन तालीम उभारणीचा निर्णय घेतला. यासाठी मेलगे परिवाराने तालीम बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. लोकवर्गणीतून तालीम तयार झाली आणि आखाडय़ाला सुरुवात झाली.

तालीममुळे त्याकाळी गावात मारुती निट्टूरकर, शंकर कोलेकर, मल्लू मेलगे, यांच्यासारखे चांगले कुस्तीपटू तयार झाले. बऱयाच कुस्ती मैदानामध्ये त्यांनी चटकदार कुस्त्या करून गावचे नाव उज्ज्वल केले. यानंतर याच तालमीत एकापेक्षा एक मल्ल तयार होऊ लागले.

गावात तयार झाले अनेक कुस्तीपटू

तालमीमुळे तरुण मुलांना कुस्तीचा छंद लागला व व्यसनी बनणाऱया तरुणांची संख्या कमी झाली. व पैलवानांची संख्या गावात वाढली. कोणत्याही कुस्तीच्या फडामध्ये येथील पैलवानांच्या निशाणीचा फेटा मानाचा ठरायचा. पुढच्या काळात गणपती सिद्धानी, नाना पाटील, मनोहर पाटील, सातेरी गोरे, मधु कुगजी, रवळू कोलेकर, गोविंद मेलगे, महादेव मेलगे, यल्लुप्पा व्हळानाचे, अशोक पाटील, सातेरी कुंभार, शिवाजी सावंत, सहदेव मेलगे, बडकु सावंत, कल्लाप्पा मेलगे, राहुल पाटील असे अनेक नामवंत पैलवान तयार झाले. आणि यासाठी गावात दरवषी होणाऱया माऊली यात्रेत कुस्त्यांचे आयोजन सुरू झाले. यामध्ये मोठमोठय़ा कुस्त्यांचे आखाडे भरवण्याची परंपरा राखली आहे. पण अलिकडच्या काळातही मातीतली कुस्ती परंपरा लोप पावत चालली आहे. आरोग्य संपदासाठी आता आधुनिक पद्धतीने व्यायामाची नितांत गरज वाढली आहे. तरुणाई जीमसारख्या आधुनिक व्यायाम शाळेकडे वळू लागल्याने तालमीतील आखाडा ओस पडू लागला. याचा विचार करून व्यायाम शाळेच्या सुधारणेसाठी ग्रामपंचायतीने अधिक लक्ष घातले व यासाठी दुमजली इमारत तयार करून खाली कुस्ती आखाडा व वरच्या मजल्यावर जीमसाठी मोठा हॉल तयार करण्यात आला. या जिममध्ये व्यायामासाठी आधुनिक पद्धतीचे साहित्य ग्राम पंचायतीने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गावातील युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.यावेळी गावातील अनेक ज्ये÷ नागरिक, व्यायामपटू, पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

मान्सून: कोडगूमध्ये रेड अलर्ट जरी

triratna

किरकोळ मार्केटमध्ये भाजीची चढय़ा दराने विक्री

Patil_p

खानापूर तालुका विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

ग्रा.पं.कर्मचाऱयांचा जिल्हा पंचायतवर मोर्चा

Amit Kulkarni

यापुढे कोणत्याही महिलेचा अपमान खपवून घेणार नाही

Amit Kulkarni

खानापूरमधील एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका

Patil_p
error: Content is protected !!