तरुण भारत

सांगली : मिरज एमआयडीसी येथे ५२ हजाराचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

कुपवाड / प्रतिनिधी 

मिरज एमआयडीसीतील डिटमार सिस्टीम नावाच्या कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी स्टोअर्स रुमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कारखान्यात ठेवलेले ५२ हजार १५० रुपये किंमतीचे लोखंडी, स्टील व अॅल्युमिनियमच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव शशांक कुलकर्णी (वय २१, रा.किल्लाभाग, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव कुलकर्णी यांच्या आईच्या नावे मिरज एमआयडीसीत डिटमार सिस्टीम (प्लॉट नंबर डब्ल्यू- ३७) या नावाने कंपनी आहे. या कंपनीत १४ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर्स रुमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यानी स्टील ब्लॉक, स्टील रॉड, डी टाईप टेस्ट ब्लॉक, बिअरींग पुलर, लोखंडी पाईप, कास्टींग, अॅल्युमिनियम गाईड यांसह स्टील व अॅल्युमिनियमचे तुकडे व  इतर साहित्य मिळून ५२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत गौरव कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Advertisements

Related Stories

धोरण लकव्यामुळे लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र मागेच – खा. संजय पाटील

triratna

महापुराच्या प्रश्नावर महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री भेटणार

triratna

कडकनाथ घोटाळा आर्थिक ताणातून महिलेची आत्महत्या

triratna

ग्रामीण विकास रुतला कोरोना खाईत

triratna

नांद्रेयात पूरग्रस्तांसाठी लोकप्रतिनिधी व तलाठी यांच्यात वादावादी

triratna

कवठेमहांकाळ एस.टी.आगार व्यवस्थापकास लाच घेताना अटक

triratna
error: Content is protected !!