तरुण भारत

‘हे’ घर भाडय़ाने देणे आहे

पाकिस्तान पंतप्रधानांचे निवासस्थान भाडय़ाने देणार

गेस्टरुमपासून लॉनदेखील रेंटवर मिळणार

Advertisements

पंतप्रधान इम्रान खान यांचे शासकीय निवासस्थान आता भाडेतत्वावर उपलब्ध झाले आहे. आर्थिक संकटाला तोंड देणाऱया पाकिस्तानने इस्लामाबाद येथील पंतप्रधानांचे निवासस्थान सर्वसामान्य लोकांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आता सांस्कृतिक, फॅशन आणि शैक्षणिक कार्यक्रमासमवेत अन्य समारंभ लोकांना आयोजित करता येणार आहेत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे ऑडिटोरियम, दोन गेस्ट विंग आणि एक लॉन भाडेतत्वावर देत निधी जमविला जाणार आहे. या परिसरात डिप्लोमॅटिक फंक्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र देखील आयोजित केले जातील. सरकार अशा आयोजनाद्वारे कमाई करणार आहे.

लोकांसाठी पैसा नाही

पाकिस्तान सरकारकडे लोककल्याणकारी योजनांसाठी पैसा नसल्याचे इम्रान खान यांनी 2019 मध्ये म्हटले होते. तेव्हापासून ते बानी गाला या स्वतःच्या निवासस्थानी राहत आहेत.  इम्रान पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था 19 अब्ज डॉलर्सपर्यंत खालावली आहे.

Related Stories

ओडिशा सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवला लॉक डाऊनचा कालावधी

prashant_c

कोरोनापॉझिटिव्ह वधूकडून उदाहरण प्रस्थापित

Patil_p

होय! वानखेडेंनी माझ्याकडूनही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार

Abhijeet Shinde

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

Rohan_P

लहान भावाने पब्जी खेळण्यास मोबाईल न दिल्याने मोठ्या भावाची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!