तरुण भारत

लारा दत्ताचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

बेल बॉटम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बेल बॉटम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ट्रेलर पाहिल्यावर लोक यातील एका व्यक्तिरेखेबद्दल चचां करत आहेत. पण ट्रेलरमधील लारा दत्ताच्या ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना थक्क करून सोडले आहे. ट्रेलरमध्ये लाराला ओळखणे अवघड आहे.

Advertisements

या चित्रपटात लारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याकरता लाराने मोठी मेहनत केली आहे. या व्यक्तिरेखेसाठी लाराने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली आहे. सोशल मीडियावर लारा आणि तिच्या मेकअप आर्टिस्टचे कौतुक केले जात आहे. इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेत लारा शोभून दिसत असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात हुमा कुरैशी देखील दिसून येणार आहे.

Related Stories

ड्रग्ज प्रकरण : रीया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर

Rohan_P

आमरस आणि मिसळ पार्टी

Patil_p

सुशांतची हत्या नाही, आत्महत्याच; एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

Rohan_P

सुशांत-रियाची जोडी जमली

tarunbharat

नव्या कलाकारांसह ‘मिस्टर लेले’ येणार

Amit Kulkarni

देवदत्त करतोय सेटवर वर्कआऊट

Patil_p
error: Content is protected !!