तरुण भारत

पुष्पा’ चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार

अभिनेता अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग नाताळाच्या दिनी प्रदर्शित होणर आहे. हा चित्रपट हिंदी समवेत 5 भाषांमध्ये झळकणार आहे. त्याचदिवशी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ देखील प्रदर्शित होणार आहे. पुष्पा चित्रपटात अल्लू साब्sात रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सुकुमार आणि संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद पुन्हा एकत्र काम करत आहेत. पुष्पाची पटकथा ऍक्शनने भरलेली आहे.  चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास अत्यंत मजेशीर राहिला.

या चित्रपटाने यापूर्वीच प्रेक्षकांदरम्यान मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चाहत्यांचे प्रेम या चित्रपटाला लाभेल अशी अपेक्षा आहे असे उद्गार मैत्री मूव्ही मेकर्सचे निर्माते नवीन यरनेनी आणि वाय. रविशंकर यांनी काढले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांना पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Advertisements

Related Stories

गाडीच्या डिक्कीत लपायची जान्हवी कपूर

Patil_p

ताराचा ‘तडप’ 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार

Patil_p

सान्या मल्होत्रा विवाह करण्यासाठी तयार

Patil_p

हृतिक रोशनची गोष्ट इयत्ता सहावीच्या पाठय़पुस्तकात

Omkar B

सिटी ऑफ ड्रीम्सचा आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री

Patil_p

आदितीची ही सवय आहे हटके

Patil_p
error: Content is protected !!