तरुण भारत

पेंटागॉननजीक बेछूट गोळीबार, अधिकाऱयाचा मृत्यू

संशयास्पद हल्लेखोरही ठार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागॉननजीक असलेल्या मेट्रोस्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात पेंटागॉनच्या एका अधिकाऱयाच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी पूर्ण भागात मोहीम राबवून संशयास्पद हल्लेखोराला कंठस्नान घातले आहे. पण हा गोळीबार कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला याची माहिती देण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या कारवाईमुळे अत्याधिक सुरक्षा असलेला भाग सील केल्यावर 1 तासासाठी लॉकडाउन लागू करण्यात आल्याची माहिती पेंटागॉनने सोशल मीडियावरून दिली. यादरम्यान पेंटागॉन मुख्यालय आणि परिसरातील लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले.

मेट्रो बस प्लॅटफॉर्मवर गोळीबाराची घटना घडली आहे. हा पेंटागॉनमध्ये येण्याचा महत्त्वाचा मार्ग असून तेथून हजारो लोक ये-जा करत असतात. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजेन्सीला अलर्ट करण्यात आले. संरक्षण विभागाच्या अधिकाऱयांना मुख्यालयातच राहण्यास सांगण्यात आले. पण काही वेळानंतर पेंटागॉनमधील लॉकडाउन हटविण्यात आले. पेंटागॉनमधून अमेरिकेच्या संरक्षण विभागाची सूत्रे हलविली जातात. तेथून काही अंतरावरच अध्यक्षांचे निवास्थान म्हणजेच व्हाइट हाउस आहे.

Related Stories

रशियात मिळाली 10 हजार वर्षे जुनी वस्ती

Patil_p

आफ्रिकेतील देशात पसरला इबोला विषाणू

Patil_p

कृत्रिम अवयवासह अंतराळात जाणार हेली

Rohan_P

101 वर्षीय मारिया यांची कोरोनावर 3 वेळा मात

Patil_p

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

दुबई विमानतळावर आता ‘डोळय़ांचा’ खेळ

Patil_p
error: Content is protected !!