तरुण भारत

मोटार सायकल अपघातात दोन ठार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / माळशिरस

घुलेवस्ती (ता. माळशिरस) येथे दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकल वरील दोन जण ठार झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

Advertisements

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, सांगवी (ता. फलटण) येथील हणुमंत शंकर बेलदार (वय ४२) (रा. सांगवी ता. फलटण जि. सातारा) हे आपल्या बुलेट मोटार सायकल क्र. (एमएच ११ सीके २७२७) वरुन आपली सासरवाडी (जत जि. सांगली) कडे निघाले होते. तर माळशिरस येथील रावसाहेब सिद (वय ४५) हे आपले शेतातील काम करून खुडूस कडुन माळशिरस कडे आपल्या फॅशन प्रो मोटार सायकल क्र. (एमएच ४५ सी ४९९३) वरून येत होते. पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर घुलेवस्ती जवळ दोन्ही मोटार सायकलींची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात झाली की अपघातात दोन्ही मोटार सायकल चालक जागेवरच ठार झाले. हणुमंत बेलदार हे फलटण एसटी आगारात चालक म्हणुन काम करीत होते.

Related Stories

फडणवीसांनी सदाभाऊंना भरवला विजयाचा पेढा

Abhijeet Shinde

अंगद घुगे खून प्रकरणी फरार तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

पंढरपूरात लक्षणे नसलेल्या 20 कोरोबाधितांवर घरातच उपचार

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांच्या केवळ ट्विटवरून ‘बेट’ व ‘गॅट बी’ परीक्षा स्थगित

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

Abhijeet Shinde

सूत व्यापाऱयाच्या अपहरणाचा प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!