तरुण भारत

अमेरिकेची ऍथिंग मू 800 मीटर्समध्ये विजेती

प्रारंभापासून अखेरपर्यंत आघाडी कायम राखण्यात यश, 1968 नंतर अमेरिकेला या इव्हेंटमध्ये पहिलेच सुवर्ण

अमेरिकेच्या ऍथिंग मू हिने महिलांच्या 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला. आश्चर्य म्हणजे अमेरिकेसाठी 800 मीटर्स महिला गटातील हे केवळ दुसरे सुवर्ण ठरले आहे. यापूर्वी, 1968 मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये मॅनिंग मिम्सने असा पराक्रम गाजवला होता.

Advertisements

ऍथिंग मू हिने प्रारंभापासून अखेरपर्यंत आघाडी कायम राखत या इव्हेंटवर आपला वरचष्मा राखला. तिने 1 मिनिट 55.21 सेकंद वेळेत सर्वप्रथम शर्यत पूर्ण केली. ब्रिटनची किली हॉजकिन्सन 1 मिनिट 55.88 सेकंद वेळेसह रौप्यपदक तर रेव्हन रॉजर्सने 1 मिनिट 56.81 सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

ऑलिम्पिक स्टेडियमवरील इव्हेंटमधील या निकालामुळे महिलांच्या 800 मीटर्समध्ये 19 वर्षीय ऍथिंग ही नवी स्टार लाभली. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे आपले लक्ष्य असल्याचे तिने यापूर्वी अनेकदा सांगितले होते. शिवाय, तिने केसात लावलेल्या हेअरपिन बॅरेटवर देखील ‘कॉन्फिडन्स’, असे लिहिले आहे.

‘मी या कामगिरीने अतिशय खुश आहे. आज माझे स्वप्न साकार झाले. मी ज्यासाठी इथे आले, तो उद्देश साध्य झाला. सुवर्ण जिंकणे, हे माझे आयुष्यभराचे स्वप्न होते. वर्षभर सरावादरम्यान जो वेग होता, तो येथेही राखता आला, याचा आनंद आहे’, असे ऍथिंग यावेळी म्हणाली.

ऍथिंग मू हिने यापूर्वी टेक्सासमध्ये झालेल्या काही शर्यतीत 400 मीटर्स व 800 मीटर्समधील विक्रम मोडीत काढले होते. नंतर अमेरिकन ट्रायलवेळी व्यावसायिक स्पर्धेत उतरत तिने 800 मीटर्सचे जेतेपद मिळवले होते.

Related Stories

तामिळनाडू-मुंबई रणजी लढत आजपासून

Patil_p

विदेशातील प्रोटोकॉल तोडू नका- रिजिजू

Patil_p

14 वर्षीय आदित्य मित्तलला पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म

Amit Kulkarni

भारतीय हॉकी पंच व्यवस्थापक वीरेंद्र सिंग यांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

भारतीय टेबल टेनिसपटूकडून निराशा

Patil_p

मियामी स्पर्धेत मरेला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!