तरुण भारत

बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर पहिला विजय

वृत्तसंस्था/ ढाका

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत  फिरकी गोलंदाज नसुम अहमदच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान बांगलादेशने विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला. टी-20 प्रकारात बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिलाच विजय आहे. ‘सामनावीर’ नसुम अहमदने 19 धावांत 4 गडी बाद केले.

Advertisements

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका खेळविली जात आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा चार सामन्यांमध्ये पराभव केला आहे. मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 बाद 131 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 20 षटकांत 108 आटोपला.

बांगलादेशच्या डावामध्ये शकीब अल हसनने 31 चेंडूत 3 चौकारांसह 36, मोहम्मद नईमने 29 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30, कर्णधार मेहमूदुल्लाने 20 चेंडूत 1 षटकारांसह 20, अतीफ हुसेनने 17 चेंडूत 3 चौकारांसह 23 तसेच मेहदी हासनने नाबाद 7 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूडने 24 धावांत 3, स्टार्कने 33 धावांत 2, झाम्पाने 26 धावांत 1 आणि टायने 22 धावांत 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 20 षटकांत 108 धावांत आटोपला. मिशेल मार्शने 45 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 45, कर्णधार वेडने 23 चेंडूत 13 तर स्टार्कने 14 चेंडूत 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. फिलीपने 1 षटकारांसह 9 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे नसुम अहमदने 19 धावांत 4, रेहमानने 16 धावांत 2, एस इस्लामने 19 धावांत 2, मेहदी हासनने 22 धावांत 1 आणि शकीब अल हसनने 24 धावांत 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकांत 7 बाद 131 (मोहम्मद नईम 30, शकीब अल हसन 36, अतिफ हुसेन 23, मेहमुदुल्ला 20, हॅजलवूड 3-24, स्टार्क 2-33, झाम्पा 1-28, टाय 1-22), ऑस्ट्रेलिया 20 षटकांत – सर्वबाद 108 (मार्श 45, स्टार्क 14, वेड 13, फिलीप 9, नसुम अहमद 4-19, रेहमान 2-16, एस.इस्लाम 2-19, मेहदी हसन 1-22, शकीब अल हसन 1-24).

Related Stories

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p

अर्थसंकल्पात क्रीडापटूंचा गौरव, मात्र तरतुदीत कपात

Patil_p

माजी फुटबॉलपटू चिन्मय चटर्जींचे निधन

Patil_p

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

triratna

बार्टी-अँड्रेस्क्यू यांच्यात अंतिम लढत

Patil_p

डेन्मार्कच्या ऍक्सलसेनचे सलग दुसरे विजेतेपद

Patil_p
error: Content is protected !!