तरुण भारत

सुपर थ्रोसह नीरज चोप्रा अंतिम फेरीत!

क्वॉलिफिकेशनमध्ये अव्वलस्थानासह फायनलमध्ये कूच, जर्मनीच्या व्हेट्टरला देखील पिछाडीवर टाकले

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

पदकाचा प्रबळ दावेदार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ऑलिम्पिक भालाफेक इव्हेंटच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ऍथलिट ठरला आहे. त्याने 86.65 मीटर्सचा जबरदस्त थ्रो करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

23 वर्षीय नीरजने पहिल्या प्रयत्नात 83.50 मीटर्सचा थ्रो करत फायनलमध्ये थेट एन्ट्री मिळवली. राष्ट्रीय सहकारी शिवपाल सिंग मात्र फायनलसाठी पात्र ठरु शकला नाही. त्याला 76.40 मीटर्सचा थ्रो करता आला. 16 ऍथलिट्समध्ये शिवपालला 12 व्या स्थानी समाधान मानावे लागले.

आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या चोप्राने अ गटातील दोन्ही क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये दर्जेदार कामगिरी साकारली. हरियाणात पानिपतनजीक खांद्रा या खेडय़ातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीरज चोप्राने दमदार सुरुवात केली आणि पहिल्या थ्रोनंतर तो जॅवेलिन एरियाच्या बाहेर गेला.

‘माझी ही पहिली ऑलिम्पिक आहे आणि या कामगिरीचा मला विशेष अभिमान आहे. यापूर्वी वॉर्म-अपमध्ये माझे प्रदर्शन सर्वसाधारण स्वरुपाचे होते. पण, क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये माझा थ्रो परफेक्ट राहिला. अँगलही उत्तम होता. अर्थात, फायनलमध्ये एकापेक्षा एक दिग्गज ऍथलिट असतील, यामुळे फायनलमधील आव्हान आणखी कडवे असेल’, असे चोप्रा आपल्या इव्हेंटनंतर म्हणाला.

नीरज चोप्राने क्वॉलिफिकेशनमध्ये टॉपला राहून फायनल गाठली, हे देखील वैशिष्टय़पूर्ण आहे. सुवर्णपदकासाठी फेवरीट मानल्या जाणाऱया व 2017 वर्ल्ड चॅम्पियन जोहान्नस व्हेट्टरपेक्षाही सरस कामगिरी साकारली, हे चोप्रासाठी विशेष लक्षवेधी आहे. व्हेट्टरने यापूर्वी चोप्राने आपल्याला नमवणे कठीण असेल, असे म्हटले होते. पण, चोप्राने याची आता पहिली चुणूक दाखवून दिली आहे.

28 वर्षीय जर्मन ऍथलिट व्हेट्टरने एप्रिल ते जून या कालावधीत सातत्याने 90 मीटर्सपेक्षा अधिकचे थ्रो केले आहेत. आपल्या पहिल्या 2 थ्रो नंतर तो धोकादायक सातव्या स्थानी फेकला गेला होता. पण, नंतर चोप्रानंतर दुसरे स्थान मिळवत त्याने फायनलमध्ये धडक मारली.

अर्शद नदीमही अंतिम फेरीत

पाकिस्तानचा अर्शद नदीम हा ब गटात अव्वलस्थानी राहत फायनलसाठी पात्र ठरला आहे. यापूर्वी 2018 आशियाई स्पर्धेत चोप्राने सुवर्ण जिंकले, त्या इव्हेंटमध्ये अर्शद नदीम कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. एकत्रित तालिकेत चोप्रा व व्हेट्टर यांच्यापाठोपाठ तिसरे स्थान मिळवत नदीम अंतिम फेरीत पोहोचला. ज्या ऍथलिटनी 83.50 मीटर्सचा मार्क पार केला असेल ते ऍथलिट किंवा 12 सर्वोत्तम प्रदर्शन साकारणारे ऍथलिट या इव्हेंटच्या फायनलसाठी पात्र ठरत असतात.

Related Stories

न्यूझीलंड विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Patil_p

स्पेनचा बुस्टा विजेता

Patil_p

2020 आयपीएलचे वेळापत्रक

Patil_p

ऑस्ट्रेलियन पथकाचे मायदेशी आगमन

Patil_p

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय

Amit Kulkarni

ऍडलेड स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बार्टी विजेती

Patil_p
error: Content is protected !!