तरुण भारत

जिल्हय़ाची रूग्णवाढ सहाशेवर स्थिर

हॉटस्पॉट तालुक्यांत संसर्ग कमी होतोय

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

कोरोनाच्या संसर्गामुळे त्रासलेल्या सातारा, कराड आणि फलटण तालुक्यातील रूग्णवाढ काही अंशी कमी होऊ लागल्याने जिल्हय़ाच्या रोजच्या बाधितांचा आकडाही कमी होऊ लागला आहे. जिल्हय़ात सलग चार दिवस रूग्णवाढ सहाशेवर स्थिर राहिली असून पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 618 जण बाधित असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 599 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कराड तालुक्यात 136 नवे रूग्ण

जिह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 618 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात कराड तालुक्यात सर्वाधिक 136 तर सातारा तालुक्यात 112 रूग्ण आढळले आहेत. तर फलटणला 113 रूग्णांची नोंद झाली आहे.

महाबळेश्वरला केवळ एका रूग्णाची नोंद

जिल्हय़ात उर्वरित आठ तालुक्यांमध्ये रूग्णसंख्या दुहेरी आकडय़ात आहे. महाबळेश्वर तालुक्यात नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. आजच्या अहवालात येथे केवळ एका रूग्णाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 19 (9415), कराड 136 (35348), खंडाळा 21 (13191), खटाव 61 (21938), कोरेगाव 62 (19273), माण 30 (14992), महाबळेश्वर 1 (4533) पाटण 19 (9619), फलटण 113 (31318), सातारा 112 (45807), वाई 35 (14459) व इतर 9 (1672) असे आजअखेर एकूण 221565 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

28 जणांचा मृत्यू

गेल्या चोवीस तासात जिल्हय़ात 28 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 1 (201), कराड 11 (1054), खंडाळा 1 (170), खटाव 2 (522), कोरेगाव 1 (415), माण 1 (305), महाबळेश्वर 0 (87), पाटण 1  (336), फलटण 4 (536), सातारा 5  (1347), वाई  1 (331) व इतर 0 (73), असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 5377 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

599 जणांना दिला डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 599 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Related Stories

योगग्राम सांबरवाडीत घराघरात योगा

triratna

सातारा : जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या योद्यांचे कार्य आदर्शवत – आ. शिवेंद्रसिंहराजे

triratna

सातारा : कराडजवळ अपघातात हडपसरचे दोघे ठार

triratna

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसाठी शनिवारी अर्ज स्वीकारणार

triratna

वाईचा ब्रिटिश कालीन कृष्णापूल होणार नामशेष, नविन पुलास मंजुरी – आमदार पाटील

triratna

सातारा : विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav
error: Content is protected !!