तरुण भारत

सोळा गुह्यातील फरार आरोपी जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा

जिह्यातील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात 16 गुह्यात फरार असलेला अटल गुन्हेगार यश उर्फ नाना पाटेवकर भाऊबीज उर्फ भावज्या काळे (मुळ रा. फत्यापूर, सध्या रा. आसगाव) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. 

Advertisements

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिह्यातील उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्याकडील पथक तयार करुन अटल गुन्हेगार यश उर्फ नाना पाटेकर भाऊबीज उर्फ भावज्या काळे यास अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याचा शोध घेवून त्यास अटक केली. त्याने कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

तसेच त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा, सातारा तालुका पोलीस ठाण्यात लुटमारीचा, भुईज पोलीस ठाण्यात मोटर चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मधूकर गुरव, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतिलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, आतिष घाडगे, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, रवी वाघमारे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो. कॉ. विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, प्रवीण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

किशोर धुमाळ एलसीबीचे नवे कारभारी

Patil_p

परप्रांतीय मुकेशचा आणखी एक कारनामा समोर

Patil_p

पाडळी ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप नाही- दत्तात्रेय ढाणे

triratna

बोटीचे सारथ्य करत राजे मंत्र्यांच्या भेटीला

Patil_p

इंडस्ट्रीयल ऑक्सिजन दुय्यम करून हॉस्पिटला प्राधान्य द्या : खा. संजय पाटील

triratna

सातारा : आठ दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

triratna
error: Content is protected !!