तरुण भारत

पेडणे पोलिसांनी रिशयन नागरिकाकडून पाच लाख रुपयांचे चरस जप्त

प्रतिनिधी /पेडणे

पेडणे पोलिसांनी रशियन नागरिकत्व असलेल्या नागरिकांकडून पाच लाख रुपये किंमतीचा  चरस हे अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी तेंबवाडा मोरजी येथे मार्क सिमस्ल या नागरिकाला रंगेहात पकडून त्यांच्याकडून  500 ग्राम चरस जप्प केला.

Advertisements

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना खास सूञाकडून माहिती मिळाली कि एक रशियन नागरिक मार्क सिमस्ल हा मारुती कारमधून जीए.11- ए.2957 या  क्रमांकाच्या   भाडेपट्टीवर घेतलेल्या   गाडीने आपल्या ग्राहकांकडे 4 जुलै रोजी तेंबवाडा मोरजी येथे  देण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी आपल्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर,  हेडकान्स्टबल  प्रवीण महाले, पोलीस कर्मचारी विनोद पेडणेकर , अर्जुन कळंगुटकर, संदेश वरक, आणि महेश नाईक यांची टिम तयार करुन सापळा रचून संशायीत मार्क याला रंगेहात चारससह पकडण्यात आले. संशयीत व त्यांनी वापरलेली अमली प्रदार्थ व्यवहारासाठी गाडीही पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत संशयीत मार्क सिमस्ल? यांच्यावर अमली प्रदार्थ  कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

 पुढील तपास पेडणे निरीक्षक उत्तर गोवा अधिक्षक सोबित सक्सेना तसेच म्हापसा उपआधिक्षक गजानन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

Related Stories

गोवा फॉरवर्डच्या काणकोणातील कार्यालयाचे 28 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

जत्रोत्सवदिनी धोंडगण व भाविकांकडून घरीच देवीची आराधना

Omkar B

नड्डाजींच्या स्वागतासाठी भाजप सज्ज

Omkar B

दोन अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचारः उत्तर प्रदेशात आरोपी जेरबंद मडगाव पोलिसांचे कौतूक

Omkar B

यंदा निवडणुकीत ‘व्होट फ्रॉम होम’!

Patil_p

मडगाव पालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू

Patil_p
error: Content is protected !!