तरुण भारत

विजय सरदेसाई यांनी जनतेची दिशाभूल करू नये

मांदे भाजपा मंडळाचा इशारा, मनोरंजन ग्राम प्रकल्प जनतेच्या हितासाठी

प्रतिनिधी /पेडणे

Advertisements

मनोरंजन ग्राम हा जनतेच्या हितासाठी आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी मांदे मतदारसंघात येऊन येथील जनतेची दिशाभूल करू नये, असा इशारा मांदे भाजपा मंडळाच्या पदाधिकाऱयांनी मांदे येथे भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

   यावेळी पेडणे भाजप मंडळ मधू परब, उपाध्यक्ष गोविंद आजगावकर, किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर, सदस्य मच्छिंद्र पेडणेकर, अनिल आसोलकर, महेश मांदेकर, रवींद्र गोवेकर आदी उपस्थित केले.

उगाच आरोप करू नयेत : मधू परब

मंत्री असताना विजय सरदेसाई यांचे अनेक कारनामे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार काढले होते. आता त्यांच्याकडील सत्ता गेल्यानंतर काही लोकाना घेवून मांद्रे मतदारसंघात येऊन आमदार दयानंद सोपटे यांच्यावर टीका करतात. त्यांनी मांदेत येऊन उगाच आरोप करु नये असा सल्ला भाजपा मंडळ अध्यक्ष मधू परब यांनी दिला.

स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल : मच्छिंद्र पेडणेकर

 मांदेतील जनता सुजाण आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी या भागात येउन जनतेची दिशाभूल करू नये. मांदे येथील नियोजित मनोरंजन प्रकल्पाचा आराखडा आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिकाना विश्वासात घेऊन मांडलेला आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, असा दावा मच्छिंद्र पेडणेकर   यांनी केला.

प्रकल्पाचा स्थानिक कलाकारांना लाभ : दत्ताराम ठाकूर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांना जनतेची जाण आणि हित माहित आहे. जे काही प्रकल्प आणतात ते जनहितासाठी असणार आहेत. अशा प्रकल्पांचे आम्ही स्वागत करतो, मनोरंजन ग्राम प्रकल्पात एक कला दालन असणार आणि कलाकारांना त्याचा लाभ मिळणार आहे, शिवाय  स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळेल असा दावा भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर केला.

माजी मुख्यमंत्री म्हणून घेतली असेल भेट

दरम्यान माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची विजय सरदेसाई यांनी भेट घेणे कितपत योग्य असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, भाजपा मंडळ अध्यक्ष मधू परब यांनी उत्तर देताना पार्सेकर हे एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. म्हणून कदाचित विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेतली असेल.

Related Stories

राज्यात ‘ब्लॅक फंगस’चे 10 रुग्ण

Amit Kulkarni

संचारबंदीचा आदेश सत्तरी तालुक्मयात फक्त कागदपत्री

Amit Kulkarni

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

सहाजणांच्या टोळीला पाठलाग करुन पकडले

Patil_p

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीस रवाना

Amit Kulkarni

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p
error: Content is protected !!