तरुण भारत

लिंबावळी यांना प्रदेशाध्यक्षपद?

बेंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा बाळगलेल्या आमदार अरविंद लिंबावळी यांना मंत्रिपदही मिळालेले नाही. त्यांना राज्य भाजपचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये राज्यात होणारी विधानसभेची निवडणूक भाजप पक्ष त्यांच्याच नेतृत्त्वाखाली लढविण्याची शक्यता आहे.

विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांना कोणत्याही क्षणी पदावरून हटविण्यात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि पक्षात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अरविंद लिंबावळी यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला सज्ज करण्यासाठी हा बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

Advertisements

Related Stories

राज्यातील 1054 केंद्रांवर एफडीएची परीक्षा सुरळीत

Amit Kulkarni

एका अपार्टमेंटमधील २८ जण कोरोना पॉझिटिव्ह

triratna

कर्नाटक: १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु

triratna

कर्नाटकात मंगळवारी ११४१ बाधित रुग्णांची भर

triratna

गुलबर्गा विद्यापीठ दीक्षांत समारंभ : शुक्रवारी १५,०२९ विद्यार्थी पदवीधर होणार

triratna

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले : मंत्री उदय सामंत

triratna
error: Content is protected !!