तरुण भारत

ऐतिहासिक! 41 वर्षांनी भारतीय हॉकी टीमने कांस्य पदकावर कोरले नाव

ऑनलाईन टीम / टोकियो : 


भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे.

Advertisements

याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये 1980 साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे. 


पाच ऑगस्ट रोजी झालेल्या कास्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना गोल करू दिली नाही. जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली.


दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने गोलचा धडाका लावला आणि 3-3 अशी बरोबरी केली.


तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून 5-3 अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती.

Related Stories

महाराष्ट्रात आज दिवसभरात 13,348 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

तिसऱ्या उद्रेकाचा मुलांना विशेष त्रास नाही!

Amit Kulkarni

सलग दुसऱ्या दिवशी लाखाहून कमी रुग्ण

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये सिंहराज अधानाला कांस्यपदक

datta jadhav

अखेर चीनचे अनियंत्रित रॉकेट कोसळले

datta jadhav

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!