तरुण भारत

एसकेई सोसायटीच्या स्थापना दिनानिमित्त डॉ. आशुतोष पोतदार यांचे उद्या व्याख्यान

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीचा स्थापना दिवस दि. 6 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी 11 वाजता आरपीडीच्या के. एम. गिरी सभागृहात डॉ. आशुतोष पोतदार यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राजमाता राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष पंकज शिवलकर उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

डॉ. आशुतोष पोतदार हे ‘नव्या युगाची शिक्षण पद्धत ः आव्हाने आणि मार्गक्रमण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ते मराठी आणि इंग्रजी भाषेतील लेखक असून संशोधकही आहेत. बहुभाषा, साहित्य, रंगभूमी हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. ‘हाकारा’ या ऑनलाईन जर्नलचे ते संस्थापक आणि सहसंपादक आहेत. त्यांनी लिहिलेली नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादर झाली आहेत. लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र फौंडेशनचा आर. सी. दातार तसेच राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला आहे. 

Related Stories

पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

Patil_p

कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप दोनच दिवसात बंद

Amit Kulkarni

क्वारंटाईन केलेल्या विविध संस्थांमध्ये समस्यांचा डोंगर

Patil_p

बिम्समधील 16 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

Amit Kulkarni

मतमोजणीसाठी साडेसातशे कर्मचाऱयांची कोरोना चाचणी

Amit Kulkarni

मुतगा येथे औषध-गोळ्य़ांचे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!