तरुण भारत

अंगणवाडी कर्मचाऱयांना आर्थिक मदत द्या

कर्मचारी नोकर संघाच्या राज्याध्यक्षांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरोनाकाळात अंगणवाडी कर्मचारी व साहाय्यिकांनी नागरिकांना घरोघरी जावून उत्तम सेवा दिली. कोरोनाने राज्यभरात 29 हून अधिक अंगणवाडी कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला. यापैकी केवळ 15 कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. उर्वरित कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नसल्याने सोमवार दि. 16 रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी नोकर संघाच्या राज्याध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवार कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले होते. परंतु केवळ कौतुक करून चालणार नाही. तर त्यांना पगारवाढ व इतर भत्ते द्यावेत, तसेच कोरोनाकाळात निधन होऊनही कोरोना वॉरियर म्हणून नोंद न झाल्याने अनेकजणांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना मदत द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी अंगणवाडी नोकर संघाच्या जिल्हाध्यक्षा दोड्डव्वा पुजारी, कार्याध्यक्षा गोदावरी, उपाध्यक्षा मंदा नेवगी, सीआयटीयुचे जिल्हा कार्याध्यक्ष जी. एम. जैनेखान यांच्यासह इतर सदस्या उपस्थित होत्या.

Related Stories

गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी

Amit Kulkarni

मंगला अंगडी यांचा गोकाकसह इतर परिसरात प्रचार

Amit Kulkarni

बेळगावात ‘दादागिरी’चे प्रकार वाढले

Amit Kulkarni

रस्त्यावरील खडीमुळे अपघाताचा धोका

Amit Kulkarni

गर्लगुंजी येथे आधुनिक पद्धतीच्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni

सरकारी जागेत बेकायदेशीर बांधकाम

Amit Kulkarni
error: Content is protected !!