तरुण भारत

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाच्या 50 हजार प्रती सारथी मोफत वाटणार

प्रतिनिधी / सांगली

छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा समाजातील तळागळामध्ये रुजवण्यासाठी छपत्रती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीकडून डॉ.जयसिंगराव पवार यांनी सोळा लेखांचे संकलन केलेला “छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ” या पुस्तकाच्या ५० हजार प्रतींची छपाई आणि मोफत वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या ग्रंथाची छपाई महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) कडून करुन घेणे व त्या प्रतींचे मोफत वाटप करण्याबाबत सारथीच्या संचालक मंडळाने नुकताच ठराव केला आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्षानिमित्त “बालभारती”कडून ज्येष्ठ इतिहासकारांच्या लेखणीतून उतरलेला हा ग्रंथ प्रकाशिक करण्यात आला होता. त्याची प्रत विनामुल्य एका महिन्यात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचे शिक्षण, राज्यकारभार, व्यक्तिमत्त्व, नेतृत्व, गुण, हिंदवी स्वराज्य स्थापना, कामगिरी, अर्थनीती, धर्मनिरपेक्षता, संरक्षण व लष्करी व्यवस्था, किल्ले आदी विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.आप्पासाहेब पवार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गो. स. सरदेसाई, कृष्णराव केळूसकर, सर जदुनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वा.सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, डॉ. अ. रा. कुलकर्णी, प्रा.नरहर कुरुंदकर, ले. कर्नल म.ग.अभ्यंकर, डॉ. भा.कृ.आपटे, श्री. गो. नि. दांडेकर व प्रा. ग. ह. खरे या प्रख्यात इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व राजनीती यांचे विविध पैलू उलगडले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ झाला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ’ या पुस्तकाचे बालभारती, पुणे या संस्थेकडून एका महिन्यात छपाई पूर्ण करून, सारथी, पुणे मार्फत विविध शासकीय संस्था, शासकीय व निमशासकीय ग्रंथालये, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था यांना, सारथी संचालक मंडळात ठराव संमत केल्याप्रमाणे, विनामुल्य वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.

Related Stories

सांगली : दुधोंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार – मंत्री यड्रावकर

triratna

सांगली : 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू

triratna

सांगली जिल्ह्यात 1833 रूग्ण वाढले, 44 मृत्यू

triratna

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध गांधीगिरी

triratna

सांगली : आष्टा शहर उपनगराध्यक्षा मनीषा जाधव यांनी दिला राजीनामा

triratna

सांगली जिल्हय़ात नवे 768 कोरोना रूग्ण,26 बळी

triratna
error: Content is protected !!