तरुण भारत

विमा कंपन्यांचेही आंदोलन

विमा कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

केंद्र सरकारने विमा कंपन्यांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. यामुळे कर्मचाऱयांचे नुकसान होणार असून हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी बुधवारी मारुती गल्ली येथे विविध सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणा देऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा जॉईंट फोरम नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनी यासह इतर विमा कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. परंतु या निर्णयाला कर्मचाऱयांचा प्रखर विरोध देशभर सुरू आहे. खासगीकरण झाल्यास कर्मचाऱयांना मोठा फटका बसणार आहे. याचसोबत पगारवाढ व पेन्शनची वाढ अशा मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत.

आंदोलनावेळी खासगीकरणाला विरोध करत हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी जी. व्ही. कुलकर्णी, एस. एस. धदेड, एच. आर. शहा व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव-कोल्हापूर बससेवेवर आठ दिवसांपासून परिणाम

Amit Kulkarni

अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट नादुरुस्त

Patil_p

शुभम शेळके यांचा किणये भागात झंझावाती प्रचार

Omkar B

हंगरगे मरगाई देवी मंदिराचा भूमीपूजन सोहळा उत्साहात

Patil_p

शहर-उपनगरांतील गल्ल्या बनल्या पार्किंगतळ

Patil_p

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर अंधारात

Patil_p
error: Content is protected !!