तरुण भारत

एकादशीला विठोबास एक कोटीचे दान

प्रतिनिधी/पंढरपूर

शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांचा देव म्हणून सावळ्या विठोबाची ओळख आहे. याच विठोबाच्या दानपेटीत एकादशीदिवशी एका भाविकाने चक्क एक कोटी रुपयांचे दान केले आहे. विशेष म्हणजे हे कोटींचे दान करीत असताना संबंधित भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर प्रशासनाला केली. या देणगीमुळे विठोबास प्रथमच इतके मोठे दान प्राप्त झाले आहे.

Advertisements

पंढरपूरचा विठोबा हा शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा देव. मात्र याठिकाणी सर्वच स्तरावरील लोक मोठÎा श्रद्धेने येतात आणि विठोबाचरणी लीन होतात. असेच मुंबई येथील एका भाविकाने विठोबाच्या चरणी लीन होत असताना  विठोबाच्या दानपेटीत एकादशीदिवशी एक कोटी रुपयांचे दान दिले आहे. यामध्ये या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर प्रशासनास केली आहे.

मंदिर वर्तुळातील चर्चेनुसार एक कोटीचे दान देणारा भाविक मुंबई येथील व्यापारी आहे. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर विमा कंपनीकडून आलेली संपूर्ण रक्कम या कुटुंबाकडून विठोबाच्या चरणी दान करण्यात आली असल्याची माहिती आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मंदिरास ठोस असे कुठलेच दान नाही. अशातच मंदिर प्रशासनाकडून कोरोनाकाळात लोकहिताच्या मदतीसाठी तब्बल तीन कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला आहे. वर्षाचे सुमारे 42 कोटी रुपयांचे दान देखील टाळेबंदीमुळे बुडले आहे. अशातच मंदिर समितीस विठोबाच्या तिजोरी त आलेल्या एक कोटी रुपयांच्या देणगीमुळे मोठा आधार आलेला आहे.

Related Stories

ज्यांनी मला मतदान केले, त्यांचा हा सत्कार : अजित पवार

prashant_c

सोलापुरात एकाच दिवशी 21 नवीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले

triratna

सोलापूर शहरात 61, ग्रामीण भागात 2172 नव्या कोरोना रुग्ण

triratna

सोलापूर : ऊसाची ट्रॉली अंगावर पडून तुंगतमधील एकजण ठार

triratna

सोलापूर शहरात 36 कोरोना पॉझिटिव्ह तर 32 कोरोनामुक्त

triratna

सोलापूर : अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसाठी मनपा राबवणार ‘खावटी अनुदान योजना’

triratna
error: Content is protected !!