तरुण भारत

मंडई म्हसोबा मंदिर उत्सव : दाक्षिणात्य पद्धतीची आकर्षक पुष्पसजावट

ऑनलाईन टीम / पुणे :

विविधरंगी फुलांनी साकारलेली ११ फूट उंच दाक्षिणात्य पद्धतीची पुष्पआरास… फुलांची सुरेख अब्दागिरी आणि धार्मिक विधींनी मंडईतील म्हसोबा मंदिरात म्हसोबा उत्सवाला प्रारंभ झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात असून प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन यांसाह महाआरती देखील करण्यात आली. 

Advertisements


शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी अभिनेता गिरीष परदेशी व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे खजिनदार राजेंद्र बलकवडे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले.

तर, दुपारी शालनअक्का उत्तमराव भिंताडे व स्मिता गणेश भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती व महानैवेद्य झाला. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सुधीर साकोरे, योगेश निकम यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली. 


धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे यंदाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणारे पोलीस अधिकारी, मनपा कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, उत्सवाचा समारोप दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

Related Stories

… अन् तीनशे रुपयांच्या बॉडी लोशनऐवजी ॲमेझॉनने दिले 19 हजारांचे हेडफोन्स

datta jadhav

गोळवलकर गुरुजी शाळेत ‘बंटी-बबली भाजी मंडई’ उपक्रम

prashant_c

पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत

prashant_c

ज्वालामुखी पार करण्याचा विक्रम

Amit Kulkarni

पुणे : बालकलाकारांनी वेशभूषेत येऊन केला रामनामाचा जयघोष

Rohan_P

नवी संसद

Patil_p
error: Content is protected !!