तरुण भारत

सांगली : पुरग्रस्त अद्याप वाऱ्यावरच…. ! नागठाण्यात संथगतीने पंचनामे सुरू…..

पूरग्रस्तांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा नाही ….

शरद माने / वाळवा

Advertisements

पलूस तालुक्यातील नागठाणे येथे ७० टक्के गाव पाण्यात होते. संपूर्ण गाव पूरग्रस्त म्हणून घोषित करा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. परंतु ज्या घरांमध्ये पाणी आले त्यांचेच सध्या गावात पंचनामे सुरू आहेत. परंतु पंचनामे संथ गतीने चालू असल्याची तक्रार लोक करीत आहेत.
सन २००५ मध्ये जेवढे पाणी आले तेवढा हा २०२१ चा महापूर येऊन गेला. नागठाणे येथे नेताजी गल्लीमध्ये तसेच मकरंद कुलकर्णी यांच्या घरापर्यंत महापुराचे पाणी आले होते.

एस.टी. स्टँड परिसरात दहा फूट पाणी आले होते. पाण्याची टाकी परिसर, बालगंधर्व विद्यालय परिसर मात्र पुरापासून सुरक्षित राहिला. सध्या जे पंचनामे चालू आहेत, ते संथ गतीने होत नाहीत, पूरग्रस्तांच्या खात्यावर अद्याप एकही रुपया आलेला नाही. महापूर येऊन आठ-नऊ दिवस झाले तरी पूरग्रस्त मात्र मदतीपासून वंचित आहेत.

Related Stories

मिरजेत सहाय्यक आयुक्तांवर जमावाचा हल्ला

triratna

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

triratna

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध गांधीगिरी

triratna

सांगली : नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय राज्यव्यापी आंदोलन

triratna

बारा तोळे सोन्यासह पंधरा लाखांची फसवणूक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

triratna

सांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

triratna
error: Content is protected !!