तरुण भारत

पुरग्रस्तांना सिमेंट पत्रे व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

ओटवणे / प्रतिनिधी:
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या नदीकाठच्या ओटवणे व सरमळे गावातील पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंसह सिमेंट पत्र्यांचे वितरण करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पूरग्रस्ताना ही मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राउळ, उपसभापती विनायक दळवी, सजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर, माजगांव शिवसेना विभागप्रमुख संजय माजगांवकर, उपविभागाप्रमुख उमेश गांवकर, ओटवणे सरपंच सौ.उत्कर्षा गांवकर, सोनू दळवी, शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे, ग्रा.पं. सदस्य महेश चव्हाण, विठोबा वरेकर, भिवसेन गांवकर, सुरेश वरेकर, रमेश वरेकर, अर्जुन वाजवे, रामदास गांवकर, रमाकांत कविटकर, पार्वती कविटकर, लवू गावडे, सुरेश गावडे, प्रीतम गावडे, हरी गावडे, विनोद सावंत, मनोज सावंत, चंद्रकांत गावडे, तुषार गावडे, लक्ष्मण सावंत, नकुळ गावडे, विजय गावडे, राजन राणे, सोहम राणे आदी उपस्थित होते.

Related Stories

मालवणात कावनाला आग लागून दहा लाखाचे नुकसान

NIKHIL_N

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

triratna

चिपळुणातील स्वराली तांबेचा सुवर्ण चौकार

Patil_p

हर्णैत बोट बुडून 40 लाखांचे नुकसान

Patil_p

चिपी ते हायवे दुपदरीकरण होणार!

NIKHIL_N

कसईनाथ डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

NIKHIL_N
error: Content is protected !!