तरुण भारत

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

बेंगळूर/प्रतिनिधी

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी बेंगळूरमधील चामराजपेटचे काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. जमीर अहमद खान यांच्या मालकीच्या सहा ठिकाणांवर एकाच वेळी पहाटे ६:०० वाजता छापेमारी केली. तसेच गुरुवारी सकाळी कर्नाटकचे माजी मंत्री आर रोशन बेग यांच्या बेंगळूर येथील घरावर छापा टाकला. दरम्यान, ते कोट्यवधी आयएमए घोटाळ्यातील आरोपी आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार जमीर यांच्या शिवाजीनगर हद्दीतील कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाजवळ बांधलेल्या बंगल्यावर, कब्बन पार्क हद्दीतील यूबी सिटी येथील फ्लॅट आणि कलासीपल्या आणि चामराजपेट येथील नॅशनल ट्रॅव्हल्स कार्यालयांच्या व्यावसायिक आस्थापनांवर छापा टाकला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना छाप्यांविषयी माहिती दिली आणि सर्व ठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

अधिकारी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, नॅशनल ट्रॅव्हल्समधील व्यावसायिक व्यवहार आणि इतर व्यावसायिक उपक्रमांची पडताळणी करत आहेत. चामराजपेटचे चार वेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कट्टर समर्थक नॅशनल ट्रॅव्हल्स ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे मालक आहेत. केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यानंतर झमीर हे कर्नाटकातील दुसरे सर्वात मोठे काँग्रेस नेते आहेत.

Advertisements

Related Stories

कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

Rohan_P

कर्नाटक: अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव घेण्यावरून सभागृहात गोंधळ

triratna

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”, मोदी-पवार भेटीवर अंजली दमानियांची खोचक टीका

triratna

कर्नाटकातील ‘या’ शहरात आढळला ‘डेल्‍टा-प्लस व्हेरियंट’चा रुग्ण

triratna

कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्यासाठी पाकचा भारताकडे प्रस्ताव

datta jadhav

‘नगर प्रशासन’च्या 530 रिक्त जागांवर लवकरच नेमणुका

Amit Kulkarni
error: Content is protected !!