तरुण भारत

“राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ”; देवेंद्र फडणवीसांची सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई/प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्य़ांचा तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या नियोजित परभणी, हिंगोली व नांदेड दौऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान, “संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना कोणी दौरे करु नका असं सांगू शकत नाही. दरम्यान, पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत. हे राज्यपाल प्रामाणिकपणे आपलं काम करतायतं त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघतीय त्या लोकांना माझा सल्ला आहे. त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

कोव्हिड-19 लसीकरण

Patil_p

दहीहंडीला परवानगी द्या; नाहीतर आंदोलन करु : आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला इशारा

Rohan_P

चंदगड तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणाच्या अडचणी संपता संपेनात

triratna

जन्मदात्या मुलानेच मित्रांच्या मदतीने केला बापाचा खून

triratna

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – मंत्री हसन मुश्रीफ

triratna

सातारा कारागृहमध्ये खळबळ; दोन कैद्यांना कोरोनाची लागण

triratna
error: Content is protected !!