तरुण भारत

भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं नवी सुरुवात ठरेल : अजित पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


‘भारतीय पुरुष हॉकी संघानं संघर्षपूर्ण खेळत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतिक्षा, प्रयत्न, परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केले आहे.

Advertisements

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. 1980 च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघानं 5-4 गोलफरकानं मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचं फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मनं जिंकली आहेत. 


पुढे ते म्हणाले, मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक केलं आहे.

Related Stories

मुंबईत आज घुमणार मराठ्यांचा आवाज

triratna

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनेकडून गुन्हा दाखल

triratna

गडचिरोलीत नक्षलवादी-पोलिसांमध्ये चकमक,दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

triratna

पुणे विभागातील 5 लाख 45 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, मंत्री दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

triratna

स्वत:च्या चुकीचा इव्हेंट कसा करायचा हे केंद्राकडून शिकावं – संजय राऊत

triratna
error: Content is protected !!