तरुण भारत

बेडग येथे घर फोडून रोकड, दागिने लंपास

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील बेडग येथे संजीरबा चौकात घर फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत अण्णासाहेब शंकर आवटी (वय 30) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

Advertisements

दरम्यान, मिरज तालुक्याच्या पूर्व भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, आठवडाभरात ही दुसरी घरफोडी आहे. 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट या कालावधीत आवटी यांच्या घरात चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आवटी यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली पाच हजारांची रोख रक्कम, सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि पैंजण असा 36 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Related Stories

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका: पालकमंत्री जयंत पाटील

triratna

सांगलीत कोरोनाचा 10 वा बळी, नवे चार रुग्ण

triratna

सांगली : इस्लामपुरचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन

triratna

सांगली : मिरजेत परिचारिकेची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

triratna

सांगली : बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

triratna

मिरजेत नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाई

triratna
error: Content is protected !!