तरुण भारत

नागपंचमीवर यंदा कोरोना व महापुराचे सावट

सलग दोन-तीन वर्षे कुंभार व्यवसाय संकटात

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्रीयन बेंदूर झाल्यानंतर सर्वांना नागपंचमीचे वेध लागतात. बैल जसा शेतकऱ्यांचा मित्र, तसाच नाग हा प्राणी सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याने, परंपरेने नागपंचमी साजरी केली जाते. तर समस्त महिलावर्ग नागालाच आपला भाऊ मानतात, त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत, त्याची मनोभावे पूजा करतात. या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावीसुद्धा नागपंचमी दिवशी मोठी यात्रा भरवली जाते. पण यंदा कोरोना व महापुरामुळे या सणावर सावट आले असून, या दिवशी सणानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Advertisements

नागपंचमी निमित शहर परिसरातील अनेक नाग मंदिरांच्या रंगरंगोटीची व सजावटीची तयारी केली जाते. शहरातील गावभागातील संग्राम मंडळ, राम मंदिर येथील नागराज मंडळ, सराफ कट्टा, हिराबाग कार्नर येथील नाग मंदिरामध्ये सणा निमित्त प्रतिवर्षी मोठी धामधूम असते. या सर्व मंडळांमध्ये व नाग मंदिरांमध्ये पंचमीला मंदिरां समोर मांडव घालून, सजावट व काही ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात येते. परंतु, कोविडचा काळ व नुकताच येऊन गेलेला महापूर पाहता हा सण यंदाही साध्याच पद्धतीने होणार आहे.

कुंभार समाजाला यंदाही महापुराचा मोठा फटका

शहरातील गणपती मंदिरामागील नदीकाठावर असलेल्या कुंभार समाजाला यंदाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. सलग दीन-तीने वर्षे दोन महापूर व कोरोना महामारीमुळे हा व्यवसाय जेमतेमच सुरु आहे. तरीही कुंभार व्यावसायिकांनी यंदा पर्यावरणपूरक मातीचे नाग तयार करण्यावर जास्त भर दिला आहे. यामध्ये साधे एक फड्याचे नाग 10 ते 20 रुपयांना जोडी, तर पाच फड्याचे नाग 30 तेब50 रुपये जोडी असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

चांदोली धरणातून २००० ते ४००० क्युसेक्स विसर्ग पाणी सोडण्यात येणार

triratna

शासकीय कार्यालयांच्या बळकटीकरण व सुसज्जतेवर भर देणे आवश्यक : जिल्हाधिकारी

triratna

सांगली : जन्म-मृत्यू दाखल्याबाबत तक्रार येता कामा नये – महापौर सूर्यवंशी

triratna

पलूस तालुक्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान

triratna

विटा नगरपालिकेत गरजूंसाठी मदत केंद्र सुरू : अ‍ॅड. वैभव पाटील

triratna

सांगली : चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

triratna
error: Content is protected !!