तरुण भारत

कोल्हापूरसाठी एलिव्हेटेड रोड उभारा

खासदार संजय मंडलिक यांची मागणी,दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिह्यासाठी राष्ट्रीय राज्यमहामार्गाकडून नवीन प्रकल्प प्रस्तावित होणार आहेत, सध्याचा पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग ज्या पध्दतीने केला गेला तो एक प्रकारे पुराच्या पाण्यासाठी धरणाचे काम करीत असल्याने महापुराच्या काळात पाण्यास फुगवटा भीषण परिस्थिती निर्माण झालेली होती. अशी परिस्थिती भविष्यात होवू नये याकरीता प्रस्तावित असलेल्या प्रकल्पात कोल्हापूरसाठी एलिव्हेटेड रोड (उड्डाणपूल) तयार करण्यात यावेत, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खासदार मंडलिक यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन एलिव्हेटेड रोड विषयी सविस्तर चर्चा केली.

यासंदर्भात माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, मुंबई – पुणे – हुबळी – बेंगळूर ते चेन्नई या देशातील मोठÎा शहरांना जोडणारा महामार्ग हा कोल्हापूर शहरापासून जात असल्याने या महामार्गाचे आता चार पदरीवरुन सहा पदरीकरण करण्याचे काम लवकरच सुरु होत आहे. 2009 व 2021 च्या महापुरावेळी नागाव फाटÎाजवळ महापुराचे पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग बंद होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रस्तावित नवीन सहा पदरी रस्ता किणी टोलनाक्यापासून ते सरनोबतवाडी पर्यंत पिलर उभा करुन कोल्हापूर शहरासाठी जाणारा एक अत्यंत देखणा व भव्य असा एलिव्हेटेड रोड उभारण्यात यावा.

त्यामुळे पुरपरिस्थितीत पाणी अडवून न राहता त्या पाण्याचा निचरा होईल. याचपध्दतीने कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर शिवाजी पुल ते केर्ली दरम्यान महापुराचे पाणी येत त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी होतो. या रस्तावरही एलिव्हेटेड रोड तयार केल्यास पावसाळ्यामध्ये बंद होणारा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यास मदत होणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी नामदार नितीन गडकरी यांचे निदर्शनास आणून दिले.

कोल्हापूर-हैद्राबाद महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा मार्ग सुकर

राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या मागणीनुसार कोल्हापूर ते हैद्राबाद महामार्गाचे सहा पदरीकरण करावे यासाठी राज्यशासनाने पुर्वीच्या ठेकेदाराची देय असलेली 300 कोटी रुपयांचे देय रक्कम देण्याचे केल्याने हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने लवकरात लवकर पुर्ण होवून भविष्यात या मार्गावरील वाहतुक सुरळीत होणार असल्याचेही खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले.

 

Related Stories

वारणा साखर कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

triratna

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह

triratna

`कौन बनेगा करोडपती’मध्ये अनुराधा भोसलेंनी जिंकले 25 लाख

triratna

थकीत तुपाशी तर परतफेड करणारे उपाशी

triratna

कोल्हापूर कोविशिल्डचे 27 हजार डोस दाखल

triratna

दहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तुटलेला हात जोडण्यात यश

triratna
error: Content is protected !!