तरुण भारत

अभियांत्रिकी सीईटीची नोंदणी पुन्हा सुरू करा

प्रतिनिधी / कोल्हापूर

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यायची इच्छा आहे. परंतू सीईटीची नोंदणी सध्या बंद झालेली आहे. त्यामुळे सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करून किमान पाच दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.

परंतू या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे . परंतू यापुर्वी नोंदणी न केल्याने संबंधीत विद्यार्थी सीईटी परीक्षा देवू शकत नाहीत. 15 जुलै रोजी ही नोंदणी बंद करण्यात आली आहे तरीही बारावीच्या निकालानंतर अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क साधून नोंदणीसाठी पुन्हा लिंक सुरू करा, अशी मागणी केली आहे. सीईटी परीक्षेची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने सीईटीच्या नोंदणीसाठी पुन्हा लिंक ओपन करावी. विद्यार्थ्यांच्या मागणीचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सीईटी नोंदणीसाठी लिंक सुरू करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

Related Stories

पावनगडावर सापडले ४०० तोफगोळे

triratna

पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल

triratna

पुन्हा लॉकडाऊन नको असल्यास काळजी घ्या – आयुक्त

triratna

गोकुळ निवडणूक : सत्ताधारी आघाडीच्या शौमिका महाडिक, तर विरोधी आघाडीच्या अंजना रेडकर विजयी

triratna

कोल्हापूर : धामणी मध्यम प्रकल्पाची निवीदा तात्काळ प्रसिध्द करा– आ. प्रकाश आबिटकर

triratna

वाढीव वीज बिलाविरोधात इरिगेशन फेडरेशन आक्रमक

triratna
error: Content is protected !!