तरुण भारत

शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून

-10 ऑगस्टपासून एप्रिल-मे 2021 उन्हाळी ऑनलाईन परीक्षा : परीक्षेची तयारी युध्द पातळीवर


प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षातील मार्च-एप्रिल 2021 च्या पदवीच्या काही परीक्षा 10 ऑगस्टपासून तर उर्वरीत पदवी व पदव्युत्तरच्या ऑनलाईन परीक्षा 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची 50 गुणांसाठीची मॉकटेस्ट आजपासून सुरू होणार आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तरच्या 435 परीक्षांपैकी काही 10 ऑगस्टपासून तर उर्वरीत परीक्षा 18 ऑगस्टपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू होणार आहेत. बी. ए., बी. कॉम., बीएस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., बी. बी. ए., बी. सी. ए., बी. सी. एस., आणि बी. व्होक यासह व्यवसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या ऑनलाईन परीक्षा 10 ऑगस्ट ते सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची 50 गुणांसाठी मॉकटेस्ट घेतली जाणार आहे. ही मॉकटेस्ट जनरल नॉलेजवर आधारीत असून 25 प्रश्नांसाठी 50 गुण असणार आहेत. आवघ्या पाच दिवसांनी परीक्षा असल्याने परीक्षेसंदर्भातील तयारी युध्द पातळीवर सुरू आहे. यासंदर्भातील सर्व माहिती शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तरी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक पळसे यांनी केले आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील तिसरा रुग्ण कोरोना मुक्त; पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप

triratna

एप्रिल, मे महिन्यातील विवाहाची 80 टक्के बुकींग रद्द

triratna

मुख्यमंत्री ठाकरे हवेतूनच माघारी

datta jadhav

सांगलीत स्वाभिमानी विकास आघाडीला खिंडार; माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

triratna

आशा, गटप्रवर्तक व 70 हजार कर्मचाऱ्यांचा संप मागे

triratna

राधानगरीचे दोन दरवाजे खुले,भोगावतीच्या पाणी पातळीत वाढ

triratna
error: Content is protected !!